मंत्री छगन भुजबळांचं खातं जाहीर! पुन्हा एकदा 'या' विभागाची जबाबदारी

    23-May-2025
Total Views |
 
Chhagan Bhujbal
 
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता त्यांचे खाते जाहीर करण्यात आले आहे. छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा खाते देण्यात आल्याची माहिती आहे. शुक्रवार, २३ मे रोजी त्यांचे खाते जाहीर करण्यात आले आहे.
 
मंगळवार, दि. २० मे रोजी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची शपथ दिली. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर छगन भुजबळ यांची वर्णी लागली आहे. मंत्रीपदाचीशपथ घेतल्यानंतर भुजबळांना कोणते खाते मिळणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
 
हे वाचलंत का? -  रूपाली चाकणकर कस्पटे कुटुंबियांच्या भेटीला! म्हणाल्या, "महिला आयोगाकडून पहिल्याच दिवशी..."
 
दुसरीकडे, भुजबळांना मुंडेंकडे असलेल्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचा कारभार दिला जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत होती. दरम्यान, आता त्यांचे खाते निश्चित झाले असून त्यांच्यावर अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
 
राजकीय कारकीर्दीत तिसऱ्यांदा हे खातं!
 
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये दि. ८ नोव्हेंबर २०१९ रोजी छगन भुजबळ यांना अन्न, नागरीपुरवठा विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. तसेच महायुती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर भुजबळांवर २ जुलै २०२३ रोजी पुन्हा राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा तिसऱ्यांदा त्यांना अन्न आणि नागरी पुरवठा खाते देण्यात आले आहे.