"भारताच्या कारवाईला त्वरित प्रत्युत्तर देऊ", पाक लष्करप्रमुखांची पोकळ धमकी

LOC वर पाकच्या कुरापती सुरुच

    02-May-2025   
Total Views | 27

any military misadventure by India will be met with a resolute response, says pakistan
 
नवी दिल्ली : (India VS Pakistan) 'भारताच्या कोणत्याही लष्करी कारवाईला त्वरित जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल', पाकिस्तान लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी म्हटले आहे. मुनीर यांनी गुरुवारी १ मे रोजी झेलममधील टिल्ला फायरिंग रेंजमध्ये सुरु असलेल्या प्रशिक्षण सरावाला भेट दिली.
 
गेल्या आठवड्यात काश्मीरच्या पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा सराव करण्यात आल्याची माहिती आहे. याचबरोबर नियंत्रण रेषेवर (LOC) पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. पाकिस्तानी लष्कराकडून सलग आठव्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, नौशेरा, अखनूर भागातील नियंत्रण रेषेवरील चौक्यांवर पाकिस्तानी लष्करी चौक्यांकडून गोळीबार सुरु आहे. भारतीय लष्करांच्या जवानांकडूनदेखील त्याला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.
 
हे वाचलंत का? -  पाकिस्तानच्या 'आयएसआय'साठी हेरगिरी करणाऱ्याला जैसलमेरमधून अटक, गुप्तचर विभागाची कारवाई
 
LOC वर पाककडून गोळीबाराच्या घटना :
 
  • १ एप्रिल : कृष्णा घाटी सेक्टरमध्ये सुरुंग स्फोट, गोळीबार. घुसखोरीसाठी पाकिस्तानी सैन्याकडून मदत.
 
  • २२- २३ एप्रिल : पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर तट्टापाणी सेक्टर, पूंछमध्ये गोळीबार. कोणतीही जीवितहानी नाही.
  • २४- २५ एप्रिल : कुपवाडातील लीपा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार.
 
  • २५-२६ एप्रिल : पाकिस्तानी सैन्याकडून LOC वरील विविध ३४ क्षेत्रांवर गोळीबार.
 
  • २६-२७ एप्रिल : उत्तर काश्मीरमधील कुपवाडात लीपा सेक्टर मध्ये गोळीबार. कोणतीही जीवितहानी नाही. तसेच कुपवाडातील टीएमजी आणि रामपूर सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवरुन गोळीबार.
 
  • २७-२८ एप्रिल : कुपवाडा आणि पूंछ जिल्ह्यात LOC ओलांडून पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांकडून गोळीबार.
 
  • २८-२९ एप्रिल : कुपवाडा, बारामुल्लातील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार, भारताकडूनही चोख प्रत्युत्तर.
 
  • २९-३० एप्रिल : नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानी चौक्यांकडून गोळीबार.
 
  • १ आणि २ मे : कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, नौशेरा, अखनूर भागातील LOCवर पाकिस्तानकडून गोळीबार.
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\
अग्रलेख
जरुर वाचा
महिला सक्षमीकरणातूनच राष्ट्राची उन्नती : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत , सोलापूरात उद्योगवर्धिनी संस्थेचा

महिला सक्षमीकरणातूनच राष्ट्राची उन्नती : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत , सोलापूरात उद्योगवर्धिनी संस्थेचा 'परिवार उत्सव' कार्यक्रम संपन्न

"वात्सल्याचे वरदान असलेल्या मातृशक्तीत समाजाच्या उद्धाराचा विचार स्वाभाविकपणे असतो. त्यामुळेच ही शक्ती उभी राहील्यानंतर राष्ट्राची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही", असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केला. महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या उद्योगवर्धिनी संस्थेच्या २१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे गुरुवार, दि. १७ जुलै रोजी 'परिवार उत्सव' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव एनएफडीसी - नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा येथे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव एनएफडीसी - नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा येथे 'भारत पॅव्हेलियन'चे करणार उद्घाटन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय माहिती व प्रसारण, रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव येत्या १८ जुलै २०२५ रोजी मुंबईतील एनएफडीसी कॉम्प्लेक्समधील नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा (NMIC) येथील गुलशन महलमध्ये भारत पॅव्हेलियनचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव राजेश कुमार मीणा आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कथाकथनाची..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121