मुंबई: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी तसेच महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी भारत गौरव टुरिस्ट ट्रेन अंतर्गत 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' या विशष पर्यटन रेल्वेची आयआरसीटीसीतर्फे घोषणा करण्यात आली आहे.
मुंबई येथून 9 जून रोजी प्रारंभ होणारा ही यात्रा 5 दिवसांची असेल. या यात्रेचा प्रवास रायगड किल्ला, पुणे, शिवनेरी किल्ला, भिमाशंकर ज्योतिर्लिंग, प्रतापगड किल्ला, कोल्हापूरची आई महालक्ष्मी, पन्हाळगड किल्ला आणि मुंबईला परत, असा असेल. तसेच यात्रेत पुणे शहरातील लालमहाल, कसबा गणपती, शिवसृष्टी याठिकाणी भेटींचाही समावेश असणार आहे. नागरिकांनी व शिवप्रेमींनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा.