स्वारगेट घटनेचा लवकरच पर्दाफाश होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    28-Feb-2025
Total Views |
 
Devendra Fadanvis Swarget
 
मुंबई : स्वारगेट प्रकरणातील आरोपीला अटक झाली असून लवकरच या घटनेचा पर्दाफाश होणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, २८ फेब्रुवारी रोजी दिली.
 
माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "स्वारगेट प्रकरणातील आरोपी लपून बसला होता. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी त्याला शोधून काढूत अटक केली आहे. लवकरच या घटनेचा पर्दाफाश होईल. पोलिस आयुक्तांनी याबाबत काही माहिती दिली असून काही माहिती योग्यवेळी लवकरच आपल्यापर्यंत पोहोचेल. नेमका घटनाक्रम काय आहे आणि तो कसा घडला यासंदर्भातील माहिती लवकरच मिळेल."
 
हे वाचलंत का? -  आरोपी दत्तात्रय गाडेचा आत्महत्येचा प्रयत्न? पुणे पोलिसांना संशय
 
शक्ती कायद्याबाबत काय म्हणाले?
 
शक्ती कायद्याबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "आपण तयार केलेला शक्ती कायदा हा अनेक कायद्यांचा अधिक्षेप करणारा कायदा होता. यावर केंद्रीय गृहविभागाने काही आक्षेप घेतले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या काही निर्णयांमध्येही शक्ती कायदा अधिक्षेप करत असून तो अधिकार राज्याला नाही. त्यामुळे यात काही बदल करण्याची आवश्यकता होती. त्यापूर्वी केंद्र सरकारने काही नवीन कायदे तयार केले आणि शक्ती कायद्यातील बहुतांश गोष्टी या नवीन संहितेत आले आहेत. त्यामुळे आम्ही याचा पुन्हा आढावा घेऊ आणि आवश्यकता असल्यास नवीन सुधारणेसह पुढची कारवाई करू," असे ते म्हणाले.