आरोपी दत्तात्रय गाडेचा आत्महत्येचा प्रयत्न? पुणे पोलिसांना संशय
28-Feb-2025
Total Views | 42
पुणे : पुणे अत्याचार घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडेचा आत्महत्येचा प्रयत्न असल्याचा संशय पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केला आहे. दत्तात्रय गाडेच्या अटकेनंतर आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत या घटनेच्या तपासाबद्दल सविस्तर माहिती दिली.
आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, “प्राथमिक वैद्यकीय तपासणीनुसार, आरोपीच्या गळ्यावर काही वळ आहेत. यावरून त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. पण दोरी तुटल्यामुळे आणि तिथे लोक पोहोचल्यामुळे ते होऊ शकले नाही. याबाबत तपास करण्यात येईल. परंतू, प्राथमिक माहितीनुसार, त्याच्या गळ्यावर काही वळ दिसतात," अशी माहिती त्यांनी दिली.
आरोपी दत्तात्रय गाडेला अटकेनंतर पुण्याच्या लष्कर पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले असून लवकरच त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवणार असल्याचे पुणे पोलिस आयुक्तांनी सांगितले आहे.