ड्रोन कॅमेरा ते गावकऱ्यांची मदत...; दत्तात्रय गाडेला पकडण्यासाठी कसा रचला सापळा?

    28-Feb-2025
Total Views | 56
 
Pune Rape Case Dattatray Gade
 
पुणे : पुणे अत्याचार घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडेला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीला अटक करण्यात गुनाट गावच्या नागरिकांनी मोठी मदत केली. दरम्यान, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत आरोपीच्या अटकेबाबत सविस्तर माहिती दिली.
 
आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, "गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक, स्वारगेट पोलिस स्टेशन आणि झोन २ चे वेगवेगळे पथक असे मिळून अंदाजे ५०० पोलिस अधिकारी आणि कर्मचारी मागच्या तीन दिवसांपासून आरोपीच्या मागावर होते. विशेषत: या ऑपरेशनमध्ये गुनाट गावातील ४०० ते ५०० लोकांचे आम्हाला भरपूर सहकार्य मिळाले. तसेच डॉग स्पॉट आणि ड्रोन कॅमेऱ्याचीसुद्धा यात मदत झाली. या सर्व प्रयत्नानंतर काल रात्री १ वाजून १० मिनिटांच्या सुमारास आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. आज त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे."
 
हे वाचलंत का? -  पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या!
 
फास्ट ट्रॅकवर खटला चालवणार!
 
"या प्रकरणाच्या तपासासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले असून सर्व दिशेने पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवणार आहोत. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून निर्जन स्थळे, एसटी स्थानके, रेल्वे स्टेशन बाहेरील परिसर, हॉट स्पॉट, टेकडीची ठिकाणे या सर्व परिसरांचे सुरक्षा ऑडिट करणे सुरु आहे," असे त्यांनी सांगितले.
 
असा घडला घटनाक्रम!
 
पहिल्या दिवशी तक्रार दाखल झाल्यानंतर दीड ते दोन तासाच्या आत वेगवेगळ्या पथकांद्वारे आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर बुधवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास पोलिस आरोपीच्या गावात पोहोचले. परंतू, त्यावेळी आरोपी मिळू शकला नाही. शेवटी गुरुवारी आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले.
 
गावकऱ्यांचा सत्कार करणार!
 
पुणे शहर पोलिस दलाततर्फे गावातील नागरिकांचे आभार मानतो. आम्ही स्वत: या गावात भेट देऊन ज्या लोकांनी आरोपीला पकडून देण्यात मदत केली त्यांचा सत्कार करणार आहोत. शेवटी ज्या गावकरांच्या माहितीवरून आरोपीची माहिती मिळाली त्यांना १ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच या गावासाठी काय करता येईल याबाबतची आमचा विचार सुरु आहे," असेही पुणे पोलिस आयुक्तांनी सांगितले आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121