धक्कादायक! पुण्यात कॅब चालकाकडून महिलेचा विनयभंग! चालत्या गाडीतून उडी घेत पीडितेची पोलिस स्टेशनमध्ये धाव

    27-Feb-2025
Total Views |
 
CAB
 
पुणे : महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांनी पुणे शहर हादरले असताना आता पुन्हा एक विनयभंगाची घटना पुढे आली आहे. एका आयटी कंपनीत कामाला असलेल्या महिलेचा कॅब चालकाने विनयभंग केला असून भयभीत झालेल्या महिलेने चालत्या कारमधून उडी घेत पोलिस स्टेशनध्ये तक्रार दाखल केली.
 
२१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. पीडित महिला कल्याणीनगर आयटी पार्कमध्ये कामाला असून तिने घरी जाण्यासाठी कॅब बुक केली. त्यानंतर त्या कॅब चालकाने मिरर सेट करून महिलेकडे फिरवला आणि अश्लील हावभाव केले.
 
हे वाचलंत का? -  साकीनाका येथील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई!
 
त्यानंतर महिलेने तात्काळ कॅबच्या बाहेर उडी घेतली आणि तब्बल २ किलोमीटर धाव घेत खडकी पोलिस स्टेशन गाठले. सुमीत कुमार असे आरोपीचे नाव असून तो उत्तर प्रदेश येथील रहिवाशी असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, खडकी पोलिस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे स्वारगेट स्थानकात बसमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता ही दुसरी घटना उघडकीस आल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.