मालेगाव बांग्लादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा! तिघांना अटक ७ जण फरार

    17-Feb-2025
Total Views |
 
Kirit Somaiyya
 
नाशिक : मालेगाव जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी आणखी एक एफआयआर दाखल करण्यात आली असून यातील तीन जणांना अटक करण्यात आली आहे. तर ७ जण अद्याप फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
तहसीलदारांनी कोणताही आदेश दिलेला नसताना तसेच मनपाने जन्मदाखला दिला नसतानाही काही जणांकडे जन्मदाखला असल्याचे आढळून आले आहे. अशा १० जणांवर मालेगाव पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
 
हे वाचलंत का? -  ठाकरेंनी शिवसेना भवनाला टाळे ठोकायला हवे! मंत्री नितेश राणेंचा खोचक टोला
 
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने मालेगाव तहसील कार्यालयातून जन्म प्रमाणपत्रासाठीचे आदेश प्राप्त करण्यासाठी करण्यात आलेला अर्ज आणि त्यासोबत जोडलेल्या छायांकित प्रतीची मागणी करण्यात आली होती. तसेच यासंबंधी तहसील कार्यालय स्तरावर झालेल्या चौकशीचीही मागणी करण्यात आली होती.
 
दरम्यान, या चौकशी अहवालाच्या आधारे मालेगाव छावणी पोलिस स्टेशनमध्ये आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात १० आरोपींचा समावेश असून त्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे तर ७ जण फरार आहेत.