राजन साळवींच्या हाती धनुष्यबाण! एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
13-Feb-2025
Total Views | 83
मुंबई : उबाठा गटाचे नेते आणि माजी आमदार राजन साळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. गुरुवार, १३ फेब्रुवारी रोजी ठाण्यातील आनंदाश्रम येथे हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शिवसेनेचे अनेक बडे नेते उपस्थित होते.
या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी मंत्री उदय सामंत, किरण सामंत, मनीषा कायंदे यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थिती होते. राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशावेळी शिवसेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. या सर्वांच्या उपस्थितीत राजन साळवी यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला.
गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, हा पक्षप्रवेश लांबणीवर गेला होता. त्यानंतर बुधवारी राजन साळवींनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला. राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाने कोकणात उबाठा गटाला मोठे भगदाड पडले आहे.