'महाराष्ट्रातील सण-उत्सव' संकल्पनेवर आधारित स्नेह संमेलनातून बालसंस्कार

    10-Feb-2025
Total Views |

Jogeshwari School Event
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : अस्मिता संचालित 'छत्रपती शिवाजी शिशु विकास मंदिर, जोगेश्वरी'चे (Chhatrapati Shivaji Shishu Vikas Mandir) वार्षिक स्नेह संमेलन नुकतेच संपन्न झाले. यावर्षी शाळेने 'महाराष्ट्रातील सण-उत्सव' या संकल्पनेवर आधारित विविध कार्यक्रमाची रुपरेषा आखली होती. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध मराठी अभिनेत्री गिरीजा ओक व त्यांच्या आई पद्मश्री पाठक उपस्थित होत्या. भारतीय संस्कृतीला जपणारा हा कार्यक्रम त्यांना भावला खरा, त्यासोबतच त्यांनी मुलांचे कौतुकही केले.

हे वातलंत का? : भारतीय ' फॅशन' ग्लोबल व्हायला हवी :नचिकेत बर्वे
 
भारतीय सण-उत्सवांमध्ये निसर्गाशी नातं सांगणारी, जवळीक असणारी अशीच त्यांची पूर्वापार रचना आहे. अगदी मुक्या प्राण्यांप्रति आदरभावही भारतीय सणांमधून व्यक्त होतो. वर्षाच्या सुरुवाती पासून ते अगदी अखेरपर्यंत प्रत्येक सणांचे महत्त्व व त्यावेळेस बदलणारे ऋतुमान, होणारा नैसर्गिक हवामानातील बदल याची सांगडसुद्धा या सणांसोबत घातलेली प्रामुख्याने आढळते. या सणांमुळे सकारात्मक ऊर्जा मिळते मानवी संबंध सुदृढ होतात. भारतीय संस्कृतीची जपणूक करणे हे आपल्याच हातात आहे. त्याचबरोबर आपल्या पिढीला आपल्या संस्कृतीचा वारसा देणे ही खूप आवश्यक आहे. या उद्देशाने शाळेने महाराष्ट्रातील सण-उत्सव या संकल्पनेवर आधारित वार्षिक स्नेह संमेलन आयोजित करण्याचे ठरवले.


Girija Oak
 
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर पारखी सर, संस्थेचे पदाधिकारी, माध्यमिक व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक व शिक्षक, समुपदेशन कक्षाची टीम उपस्थित होती. कार्यक्रमाची सुरुवात रामरक्षा स्तोत्राने झाली व सांगता पसायदानाने झाली.