Babri Masjid : 'बाबरी'च्या वीटेतून ध्रुवीकरणाचे राजकारण

    08-Dec-2025   
Total Views |
 
Babri Masjid
 
मुंबई : (Babri Masjid) पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचा निलंबित आमदार हुमायूं कबीर याने दि. 6 डिसेंबर रोजी मुर्शिदाबाद येथे बाबरी मशीदीची (Babri Masjid) वीट रचली. त्यानुसार त्याने केलेल्या घोषणेनंतर लगेचच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यास निलंबितही केले. मुळात विरोध मशीद उभारणीला नसून, ती बाबराच्या (Babri Masjid) नावाने उभारण्याला आहे. समाजात जाणूनबुजून ध्रुवीकरण निर्माण करण्याचा हुमायूं कबीर याचा हा स्पष्ट प्रयत्न असल्याचे दिसतेय. ही कोणत्याही समुदायाच्या भल्यासाठी नसून निव्वळ फायदा, ध्रुवीकरण आणि प्रसिद्धी मिळवण्याची मानसिकता म्हणावी लागेल. रामजन्मभूमी-बाबरी मशीद (Babri Masjid) प्रकरणातील माजी वादी इक्बाल अन्सारी यांनीदेखील ठणकावून सांगितले की, बाबरच्या नावाने मशीद बांधणे हे ना राजकारणाच्या दृष्टीने योग्य आहे, ना समाजासाठी हितकारक.
 
बाबरीचा (Babri Masjid) विषय हा देशात अतिशय संवेदनशील आणि ऐतिहासिकरीत्या विवादित आहे. 33 वर्षांनंतरही पुन्हा त्याच नावाचा वापर करून स्मारक उभारण्याची घोषणा म्हणजे राजकीय फायद्यासाठी भावनांना चिथावणी देण्यासमान आहे. अशा कृती समाजाच्या एकोपा-शांतीच्या पूर्ण विरुद्ध आहेत. राजकीय स्वार्थासाठी धार्मिक प्रतीकांचा वापर करण्याच्या अशा मानसिकतेने स्थानिक पातळीवर तणाव वाढवण्याचा धोका निश्चितच निर्माण होऊ शकतो. (Babri Masjid)
 
हेही वाचा :  Maharashtra Assembly : विधिमंडळाच्या दिवंगत सदस्यांना विधानसभेत श्रद्धांजली
 
इक्बाल अन्सारी यांनी स्वतः आठवण करून दिली की, ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमी विरुद्ध बाबरी मशीद (Babri Masjid) वादावर अंतिम निकाल दिला होता. न्यायालयाने मुस्लिम समाजाला ५ एकर जमीन देण्याचा आदेश दिला आणि देशभरातील मुस्लीम समाजाने हा आदेश मान्य केला. आज या मुद्द्यावर ना कोणते तणाव आहेत, ना कोणती कायदेशीर लढाई बाकी आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात बाबरीचा मुद्दा पुन्हा उभा करणे हा निव्वळ राजकीय हेतू वाटतो. मुळात बाबरने ना हिंदूंसाठी काही केले, ना मुसलमानांच्या भल्यासाठी काही केले. त्यामुळे बाबरच्या नावाची कोणतीही मशीद बांधली जाऊ नये, हा आमचा ठाम निर्धार आहे.
 
रामजन्मभूमी प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने निकाली लावले आहे. देश एक संवेदनशील टप्पा पार करून पुढे जात असताना अशा जुन्या वादांना पुन्हा उकरून काढणे म्हणजे, न्यायनिर्णयाच्या आत्म्याची अवहेलना म्हणावी लागेल. त्यामुळे अशा विकृतींचा निषेध करणे हे समाजातील सर्व घटकांचे, विशेषतः जबाबदार नागरिकांचे कर्तव्य आहे. (Babri Masjid)
 
हे वाचलात का ?:  Vande Mataram : वंदे मातरम्‌ व राज्यगीताने हिवाळी अधिवेशनाच्या विधान परिषदेच्या कामकाजास सुरूवात...
 
कोलकात्याच्या ऐतिहासिक ब्रिगेड परेड मैदानात रविवारी लाखो लोकांनी एकत्र येऊन सामूहिकरीत्या गीता पठण करून इतिहास रचला. कार्यक्रमाला कथावाचक धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर बाबा), साध्वी ऋतंभरा आणि स्वामी ज्ञानानंद उपस्थित होते. त्यानंतर लगेचच हुमायूं कबीरने फेब्रुवारी महिन्यात एक लाख लोकांकडून कुराण पठण करवून घेणार असल्याची घोषणा केली. हे म्हणजे लाखो हिंदूंची भव्य उपस्थिती पाहून हुमायूंचा झालेला जळफळाट म्हणावा लागेल. (Babri Masjid) 
 
लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून, त्यांच्या भावना जाणूनबुजून उत्तेजित करून दंगली घडवण्याच्या उद्देशाने या गोष्टी सुरु आहेत. मुस्लिम समाजाच्या तरुणांना आवाहन आहे की, त्यांनी अशा गोष्टींना बळी पडू नका. आपण आपल्या शिक्षणाकडे, रोजगाराकडे आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हा. धर्म आणि देश यामध्ये आज देशाला प्राधान्य देण्याची वेळ आलेली आहे. बाबर हा एक शासक होता तो आपला वंशज नाही. त्याच्या शासनकाळात त्याने जी कृरता केली, त्याला आजचे कट्टरपंथीय खतपाणी घालण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना भारतातल्या चांगल्या मुसलमानांना गैरव्यवहारात अडकवून देशातील समतोल बिघडवायचा आहे. अशा कट्टपंथींपासून सावध राहणे हे सुशिक्षित मुस्लिम मुलांचे काम आहे. (Babri Masjid)
- आबिद अली यासीन चौधरी, राष्ट्रीय सहप्रभारी, सूफी संवाद अभियान
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक