कमळ फुललं! कल्याण-डोंबिवलीत भाजपच्या तीन नगरसेविकांचा विजय
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मतदार संघातून भाजपच्या विजयाची सुरुवात
31-Dec-2025
Total Views |
डोंबिवली (Rekha Chaudhari, Asawari Naware) : राज्यात भाजपने महानगरपालिका निवडणुकीत खाते उघडले असून निकालाआधीच भाजपचा पहिला उमेदवार विजयी झाला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांमुळे ही कमाल झाली. भाजपच्या रेखा राजन चौधरी आणि तसेच प्रभाग क्र. २६-क मधून आसावरीताई केदार नवरे आणि रंजना मितेश पेणकर पॅनल नंबर २६ या अन्य दोन नगरसेविकांची बिनविरोध निवड झाली आहे. रेखा चौधरी या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या कार्यकर्त्या आहेत. आसावरीताई केदार नवरे आणि रंजना मितेश पेणकर पॅनल या भाजपच्या धडाडीच्या कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या विजयाबद्दल मुख्यमंत्र्यांनीही त्यांचे अभिनंदन कले.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी करुन दाखवलं! राज्यातील नगरपालिकेतील भाजपचा पहिला विजय! प्रभाग क्र. १८ मधून रेखाताई चौधरी आणि प्रभाग क्र. २६-क मधून आसावरीताई केदार नवरे यांचा नगरसेविका पदी बिनविरोध विजय झाला. या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन द्वारे दोन्ही… pic.twitter.com/gnTeWEG0Zv
रेखा चौधरी आणि आसावरीताई नवरे यांचा विजय हा हिंदुत्वाचा पहिला विजय असल्याची प्रतिक्रिया भाजप कडून व्यक्त करण्यात आली आहे. रेखा चौधरी भाजपच्या कल्याण विभागाच्या महिला मोर्च्याच्या चौधरी या जिल्हाध्यक्ष आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिके प्रभाग क्रमांक २८ अ मधून त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजपने खाते उघडले खाते उघडले आहे. प्रभाग क्रमांक २८ अ मधून रेखा चौधरी यांचा एकमेव अर्ज आला होता. कुठलाही अतिरिक्त अर्ज न आल्याने रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
डोंबिवली तील आसावरी केदार नवरे आणि रंजना मितेश पेणकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. या दोन्ही उमेदवार पॅनल क्रमांक २६ मधून निवडणूक रिंगणात होत्या. २६ (क) या मधील उमेदवार आसावरी यांच्या समोर कोणाताही अर्ज आला नाही. त्यामुळे त्यांची मंगळवारी रात्री उशिरा बिनविरोध निवड झाल्याचे समजताच भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तर याच पॅनल मधील ब या आरक्षित जागेवर निवडणूक रिंगणात असलेल्या रंजना पेणकर यांच्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवारांचा अर्ज छाननीत बाद झाला आहे. त्यामुळे पेणकर या देखील बिनविरोध निवडून आल्या आहेत. विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन द्वारे दोन्ही विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही विजेत्यांचे अभिनंदन केले.