मुंबई : (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे. मंत्रालयात जवळपास १५ मिनिटे या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे. (Eknath Shinde)
नवी मुंबई आणि ठाणे महानगरपालिकांसंदर्भात ही चर्चा असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. आगामी महानगरपालिका निवडणूकांमध्ये शक्य तिथे महायुतीत निवडणूका लढण्याचा निर्णय महायुतीच्या नेत्यांनी घेतला आहे. परंतू, गेल्या अनेक दिवसांपासून मंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नाराजी असल्याचे बोलले जात होते. दरम्यान, आता दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी बंद दाराआड चर्चा केली असून नाराजीच्या चर्चांवर पडदा टाकला आहे. (Eknath Shinde)
नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूकीत चंद्रपूर जिल्ह्यात भाजपला कमी जागा मिळाल्याने पक्षाचे नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पक्ष नेतृत्वावर टीका केली होती. तसेच ते नाराज असल्याच्याही चर्चा होत्या. मात्र, मंगळवारी, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. (Eknath Shinde)
मुनगंटीवार यांनी स्वत: पोस्ट करत या भेटीची माहिती दिली. ते म्हणाले की, "राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील वर्षा निवासस्थानी भेट घेऊन विविध विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांना धानाचा प्रति हेक्टर २० हजार बोनस, आधारभूत धान खरेदी नोंदणीची अंतिम तारीख ३१ जानेवारीपर्यंत वाढविणे, अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती नुकसानीसाठी विशेष बाब म्हणून ३ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रधारक शेतकऱ्यांना मदत, तसेच बल्लारपूर येथे ईएसआयसी रुग्णालय, राज्य राखीव पोलीस बल व महिला सहकारी औद्योगिक वसाहतीसाठी मौजा विसापूर येथील बंद असलेल्या पावर हाऊसची ३१.३५ हेक्टर मधील जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात तसेच आदी विषयांवर आग्रही मागणी केली." (Eknath Shinde)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....