Devendra Fadnavis :आमचे हिंदुत्व व्यापक; मतांकरिता भगवी शाल घालणारे आम्ही नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ठाकरे बंधूंना जोरदार प्रत्युत्तर

    24-Dec-2025   
Total Views |
 
Devendra Fadnavis
 
मुंबई : (Devendra Fadnavis) आमचे हिंदुत्व व्यापक आहे. केवळ मतांकरिता भगवी शाल घालणारे आम्ही नाही, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना दिले आहे. युतीबाबत घोषणा करण्यासाठी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर (Devendra Fadnavis) टीका केली होती.
 
यावर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, "व्हिडिओ तर काही तयार करता येतात. पण अखख्या दुनियेला माहिती आहे की, देवेंद्र फडणवीस पैदाच हिंदुत्ववादी झाला आणि हिंदुत्वातच मरेल. फक्त मतांकरिता भगवी शाल घालणारे आम्ही नाही. फक्त मतांकरिता रोज मत बदलणारे आम्ही लोक नाही. आम्ही हिंदुत्ववादी कालही होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू. आमचे हिंदुत्व जनतेने पाहिले आहे आणि त्यांना ते मान्य आहे." (Devendra Fadnavis)
 
हेही वाचा :  Devendra Fadnavis : ठाकरेंचा ट्रॅक रेकॉर्ड हा भ्रष्टाचाराचा आणि स्वहिताचा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
आम्ही हिंदुत्ववादी होतो आणि आहोत
 
"मुंबई आणि महाराष्ट्र हा हिंदुत्ववादीच आहे. जे जे लोक हिंदुत्ववादापासून फारकत घेतील, लांगुलचालन करतील त्यांची काय अवस्था होते हे विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी बघितले आहे. आम्ही हिंदुत्ववादी होतो आणि आहोत. आम्ही संकुचित नाही. आमचा हिंदुत्ववाद हा केवळ पूजा पद्धतीवर आधारित हिंदुत्ववाद नाही, तर तो भारतीय जीवन पद्धतीवर आधारित आहे. या भारतीय जीवन पद्धतीला स्वीकारणारा, हिंदू समाजाची जी मानके मानतो. प्रभू श्रीराम हे केवळ देव नसून ते आमच्या संस्कृतीचे मानक आहेत. त्यामुळे जर प्रभू श्रीरामांना कुणी मानत असेल तर त्याची जात धर्म न पाहता त्याला आम्ही सोबत घेतले आहे. आमचे हिंदुत्व व्यापक आहे, पण आम्ही हिंदुत्व सोडणार नाही. त्यामुळे पलटी मारणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये," अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) केली.
 
जुनी पापे धुता येत नाही
 
"किमान निवडणुकीत मत मिळवण्याकरिता तरी आता त्यांनी आपले मत बदलले आहे. नेहमीप्रमाणे पलटी मारलेली आहे. पण ही मारलेली पलटी आहे, ती सुकाव आहे. त्यामुळे त्यांनी त्यात तसेच राहावे. उद्या पुन्हा त्यांनी बदलू नये. पण शेवटी जुने पाप लोकांनी बघितलेली असून ती जुनी पापं धुता येणार नाहीत," असेही ते म्हणाले. तसेच आमची युती अंतिम टप्प्यात असून लवकरच आम्ही त्याची घोषणा करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. (Devendra Fadnavis)
 
हे वाचलात का ?: Devendra Fadnavis : ‘खोदा पहाड, चुहा भी नही निकला!’ ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्र्यांची जोरदार टीका 
 
नवी मुंबई विमानतळाला लवकरच दि.बा. पाटील यांचे नाव
 
"नवी मुंबई विमानतळ उद्यापासून सेवेत येत आहे, याचा मला आनंद आहे. या विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील साहेब यांचे नाव देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला आहे. तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे विचाराधीन आहे. त्यावर कारवाई चाललेली आहे. आम्ही त्यासंदर्भात केंद्रातल्या सर्व नेत्यांनाही भेटलो असून प्रधानमंत्र्यांकडेही त्याबाबतचे सुतोवाच केले आहे. त्याला मान्यता मिळेल आणि लवकरच या विमानतळाचे नाव हे दिबा पाटील विमानतळ होईल," असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला.
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....