मुंबई : (Chhattisgarh) छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातल्या आमाबेडा भागातील एका सरपंचाच्या वडिलांच्या दफनविधीवरून मोठा वाद निर्माण झाल्यानंतर जवळजवळ एक आठवड्यानंतर आदिवासी नागरिकांकडून राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला. या बंदला सर्वस्तरीय समाजातून पाठिंबा मिळाल्याने छत्तीसगह चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स यांनीही पाठिंबा दर्शवला. (Chhattisgarh)
मिळालेल्या माहितीनुसार, आमाबेडा भागातल्या बड़े तेवडा गावचे सरपंच राजमान सलाम यांनी त्यांच्या वडिलांचा मृतदेह गावकऱ्यांच्या विरोधानंतरही गावच्या हद्दीत दफन केल्याने वाद निर्माण झाला. गावातील आदिवासी समाजाने सांगितले की, गावचे सरपंच आदिवासी असल्याचे दाखवतात, मग त्यांनी त्यांच्या वडिलांचा अंत्यविधी ख्रिश्चन विधीपरंपरेनुसार का केला. (Chhattisgarh)
सरपंचांनी केलेली घटना हि आदिवासींच्या पाचव्या अनुसूचीतील नियमांचे आणि अंत्यसंस्काराशी संबंधित पारंपारिक पद्धतीचे उल्लंघन असल्याचे स्थानिकांनी सांगितले. या नियमानुसार स्थानिक आदिवासींच्या परवानगीशिवाय परिसरात कुणाचेही दफन करता येऊ शकत नाही. राजमान सलाम यांनी ग्रामस्थांना झुगारून वडिलांचे दफन केले आणि त्यावर कबर बांधली होती. (Chhattisgarh)
सरपंचांनी वडिलांचे ख्रिश्चन पद्धतीने अंत्यसंस्कार करून कबर बांधल्याने संतप्त ग्रामस्थांनी दोन दिवस धरणे प्रदर्शन केले होते. त्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेत दि. १८ डिसेंबर रोजी कबर उकरून काढली होती. ग्रामस्थांनी त्यांच्या परवानगी शिवाय कृत्य करणाऱ्या सरपंचांविरूद्ध तसेच परिसरात अवैध धर्मांतरण करणाऱ्या चर्चविरूद्ध कांकेर जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले. (Chhattisgarh)
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.