Chandrashekhar Bawankule : मुंबई तोडण्याची खोटी कॅसेट दरवेळी प्रमाणे लावली जात आहे : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Total Views |
 Chandrashekhar Bawankule
 
मुंबई : (Chandrashekhar Bawankule) "मुंबई तोडण्याची खोटी कॅसेट दरवेळी प्रमाणे लावली जात आहे.मुंबईच्या विकासाबाबत ते एकही शब्द बोलत नाहीत. आम्ही विकासावर बोलतोय त्यामुळे जनता आमच्या सोबत आहे.ठाकरे बंधूची युती स्वतःचे लयाला गेलेले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आहे. कायम भावनिक आवाहन चालत नाही. मुंबईचा महापौर महायुतीचाच होईल."असे मत महसूल मंत्री चंदशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ठाकरे बंधूंच्या युतीबाबत गुरुवार दि.२४ रोजी मंत्रालय येथे व्यक्त केले.
 
"हिंदुत्वाशी फारकत घेतली म्हणून जनतेने त्यांना सोडले असून उबाठाला स्वतःची लोक सांभाळता येत नाहीत त्यामुळे त्यांचे लोक आमच्याकडे येत आहेत.त्यांनी याच आत्मचिंतन करावे.मुंबईत त्यांची अवस्था नगरपालिका निकालाप्रमाणे होईल.त्यांना मुंबईत लढण्यासाठी उमेदवार पण नाही आहेत त्यामुळे ही ठाकरेंची युती आहे."असेही बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.
 
हेही वाचा :  Devendra Fadnavis : ‘खोदा पहाड, चुहा भी नही निकला!’ ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्र्यांची जोरदार टीका
 
"महाराष्ट्र आणि मुंबईतून बांगलादेशी खुसखोर हद्दपार होतील अशी योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बनवली आहे.खोट्या कागदपत्रांचा वापर करून केलेली त्यांची मतदान नोंदणी पण रद्द होणार यासाठी काम सुरू आहे.नाशिक आणि धाराशिव मध्ये लोकसभा निवडणुकीत विजयानंतर पाकिस्तानचे झेंडे महाविकास आघाडीच्या रॅलीत फडकवले गेले." असेही बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी स्पष्ट केले.
 
"उद्धव ठाकरेंच्या २५ वर्षाच्या सत्ता काळात जो मराठी माणूस मुंबईच्या बाहेर गेला त्याला मुंबईत आणण्याचे काम महायुतीने केले आहे. आम्ही पण मराठीच आहोत. जगातला कोणीही मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही. जनता आता विकासाला मत देईल." असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. (Chandrashekhar Bawankule)
 
हे वाचलात का ?: Raj Thackeray : आमच्यातील वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे; राज ठाकरे 
 
"ज्यांचा मुहूर्तच बाराचा आहे त्या आघाडीचे बाराच वाजणार आहेत. त्यामुळेच राऊत यांनी जाणीवपूर्वक बाराचा मुहूर्त निवडला असेल. घोषणा झाल्यानंतर राऊत यांना घोषणा करण्याचे अधिकार कुणी दिले अशी विचारणा करत राज ठाकरे यांची चिडचिड झाली होती." असे प्रतिपादन भाजपा माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी बुधवार दि.२४ रोजी केले. (Chandrashekhar Bawankule)
 
"जस जशी निवडणूक जवळ येईल तसतस ठाकरे बंधूंची अस्वस्थता वाढणार आहे. ठाकरे बंधूंच्या युतीचे क्रेडिट राऊत घेत असल्यामुळे अनेक जण नाराज आहेत. तसेच हे मुंबईसाठी नाही तर खुर्ची आणि सत्तेसाठी एकत्र आहेत हे महाराष्ट्राने ओळखले आहे. ही ऐतिहासिक पर्वाची नाही तर पराभवाची सुरुवात आहे."असेही बन म्हणाले. (Chandrashekhar Bawankule)
 
 

मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com