केंद्र सरकारचा नवा नियम! मेसेजिंग अँप्ससाठी आता सिम कार्ड अनिवार्य
02-Dec-2025
Total Views |
मुंबई : ( Messaging Apps ) देशात पहिल्यांदाच मेसेजिंग अँप्ससाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारने इनएक्टिव नंबरचा गैरवापर, फसवणूक, आणि स्पॅम थांबावेत म्हणून व्हॉट्सॲप, टेलिग्राम, सिग्नल, स्नॅपचॅट, शेअरचॅट, जिओचॅट, अरताई आणि जोश यांसारखे मेसेजिंग प्लॅटफॉर्म्स, मोबाइलमध्ये सिम कार्ड असल्याशिवाय चालू शकणार नाहीत.
तसेच ‘सिम बाइंडिंग’ अंतर्गत जर मोबाइलमधून सिम काढले गेले, तर व्हॉट्सॲप आणि इतर दुसरे मेसेजिंग ॲप्स देखील बंद होतील. लॅपटॉप किंवा डेस्कटॉप यूजर्ससाठी देखील नवीन नियमावली केंद्र सरकारने जाहीर केली आहे.
यात यूजर्सना दर सहा तासांनी त्यांच्या लॅपटॉप आणि डेस्कटॉपमधून व्हॉट्सॲप लाँगआऊट करावे लागणार आहे व यानंतर त्यांना पुन्हा क्यूआर कोड द्वारे लॉगिन करावे लागेल. युजर्सना सायबर सुरक्षा मिळावी यासाठी हे नवीन नियम सरकारने लागू केले आहे.