‘वुमन ऑफ इम्पॅक्ट’तर्फे समाजात प्रकाश पसरवणाऱ्या १२ महिलांचा गौरव

    16-Dec-2025
Total Views |

Women of Impact – Season 2
 
मुंबई : ( Women of Impact – Season 2 ) रचना आर्टस् अँड क्रिएशन्स आयोजित महिलांच्या प्रभावी कामगिरीचा गौरव करणारा ‘Women of Impact – Season 2’ हा प्रतिष्ठित सोहळा 12 डिसेंबर 2025 रोजी NSE, BKC – मुंबई येथे भव्यदिव्य पद्धतीने पार पडला. कार्यक्रमाची संकल्पना सौ. रचना लचके बागवे यांची असून “Making a Difference : Breaking Barriers” महिलांचे योगदान, नेतृत्व आणि सामाजिक बदलातील भूमिका याद्वारे अधोरेखित करण्यात आली. कार्यक्रमाला “वॉटर मदर ऑफ इंडिया” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीमती अमला रुईया प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. श्री संजीव पेंढारकर, व्यवस्थापकीय संचालक विको व रूरल रिलेशन्सचे श्री प्रदीप लोखंडे, एन एस ईच्या रिमा मोहन विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
 
‘वुमन ऑफ इम्पॅक्ट’ या उपक्रमांतर्गत समाजपरिवर्तनात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या देशातील १२ प्रेरणादायी महिलांचा सन्मान करण्यात आला.
 
सन्मानित महिलांमध्ये प्रमुख नावं :
 
डॉ. राणी बंग – आदिवासी व ग्रामीण आरोग्य क्षेत्रातील भरीव कार्य (Lifetime Achievement)
 
सोनल रुपारेल – Sharon Vision
 
सौ. प्रियंका प्रमोद गांधी – हॉटेल कोकण कट्टा
 
डॉ. सुनीता दुबे – MedscapeIndia
 
नीता पवाणी – Innovative Krish Product Pvt. Ltd.
 
सुनीता रामणाथकर – Mitchell Group LLC
 
आर्किटेक्ट शीतल सोनवणे उगले – ArtofShital
 
रासिका कुलकर्णी – Indian Institute of Sport Management
 
निलीमा चतुर्वेदी – कोरिया महिला गृह उद्योग
 
स्नेहा आतिश – Kankshini Studio
 
डॉ. प्रियांका पितळे – Oyster Dental
 
ऋतुजा बागवे - अभिनेत्री
 
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या नेतृत्वगुणांवर, त्यांच्या संघर्षावर आणि समाज घडणीतील योगदानावर प्रकाश टाकला. महिलांना केवळ संधी दिल्यास त्या कुटुंब, समाज आणि राष्ट्र बदलू शकतात, असा ठाम संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.
 
हेही वाचा : पृथ्वीराज चव्हाण यांचे विधान हास्यास्पद - मंत्री गिरीश महाजन
 
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ‘वॉटर मदर ऑफ इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमला रुईया यांनी आपल्या भाषणात सांगीतले की, “जल संवर्धनाच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये पाण्याची उपलब्धता वाढली असून त्यामुळे शेती, रोजगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठी समृद्धी आली आहे.” विकोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव पेंढारकर यांनी विकोच्या यशाचे श्रेय सर्व महिलांना दिले. सर्व महिला या मुळातच सुंदर असतात असे मत त्यांनी मांडले.
 
रूरल रिलेशन्सचे श्री. प्रदीप लोखंडे यांनी, भारतातील महिला बदलत आहेत आणि प्रचंड प्रगती करत आहेत असे मत मांडले. आज भारतात जवळपास ८ लाख हुन अधिक महिला ग्रामीण भागात ग्राम पंचायत, नगरपालिका व महानगरपालिकेत सक्रिय राजकारण करत आहेत व समाजात सुयोग्य बदल घडवत आहेत. कारण महिला ही समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करत असते.
 
हे वाचलत का? -  Bala Nandgaonkar : "हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकता..."; नेमकं काय म्हणाले बाळा नांदगावकर?
 
रीमा मोहन यांनी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज फाउंडेशनद्वारा करण्यात येत असलेल्या कार्याची माहिती दिली. सौ. रचना लचके बागवे यांनी कार्यक्रमाची संकल्पना समजावून सांगितली, तसेच 'वूमन ऑफ इम्पॅक्ट कम्युनिटी' च्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना सक्षम करण्याचा निर्धार त्यांनी या वेळी केला. जास्तीत जास्त महिलांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. महिला सशक्तीकरण, उद्योजकता आणि प्रेरणादायी कार्याचा उत्सव साजरा करणारा हा कार्यक्रम समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे.