नागपूर : (Devendra Fadnavis) आगामी निवडणूकांसाठी कुठलाही फॉर्म्युला नसून केवळ जिंकणे हाच आमचा फॉर्म्युला आहे आणि मुंबईत महायुतीचाच महापौर होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला. मुंबई भाजप कार्यकर्त्यांमध्ये युतीबाबत नाराजी आहे का? यावर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, "कुणामध्ये अशी फार नाराजी असेल असे वाटत नाही. आपल्याला जास्त संधी मिळाली पाहिजे असे कार्यकर्त्यांना वाटते पण मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा लावणे आणि महापालिकेत विकास उन्मुख आणि पारदर्शी शासन आणणे, सर्वात महत्वाचे आहे. त्यासाठीच आम्ही महायुतीचाच निर्णय केला आहे."
आदिवासी भागात मुलींचा सौदा होत असल्याच्या प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की, "आदिवासी मुली बेपत्ता प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून लवकरच चौकशी केली जाईल." (Devendra Fadnavis)
"भाजप एक महत्वाचा पक्ष असून अजून कुठलीही जागांची मागणी केली नाही. कल्याण-डोंबिवलीत मागच्या वेळी आमच्या ४२ जागा आल्या होत्या. तिथे फक्त शिवसेना आणि भाजप हे दोनच प्रमुख पक्ष आहेत. बाकी तिसऱ्या पक्षाचा तिथे फारसा वजूद नाही. त्यामुळे आम्ही आपापसांत बसून जागावाटप करू. आमचा कुठलाही फॉर्म्युला नसून केवळ जिंकणे हा फॉर्म्युला आहे," असेही ते (Devendra Fadnavis) म्हणाले.
अजितदादांनी व्यक्त केलेली चिंता बरोबर
"अनेकदा अजितदादा एखादी गोष्ट बोलतात तेव्हा लोक त्याचा वेगळा अर्थ काढतात. बार्टी आणि सारथीची योजना ही जे हुशार लोक पीएचडी करू शकत नाही त्यांच्यासाठी आहे. पण एका घरातील ५ लोक या योजनेचा लाभ घेत असतील तर इतर घरातील होतकरू लोकांना त्याचा लाभ मिळणार नाही, ही अजितदादांनी व्यक्त केलेली चिंता बरोबर आहे. यासंदर्भात योग्य निर्णय करावा लागेल," असेही मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) स्पष्ट केले.
राज ठाकरे यांनी लहान मुले बेपत्ता होण्यासंदर्भात लिहिलेल्या पत्राबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "मी अजून पत्र वाचलेले नाही. पण बेपत्ता होणाऱ्या मुलींसदर्भात यापूर्वीही मी आकडेवारीसहित त्याची कारणे दिली आहेत. तसेच किती मुली परत येतात हेदेखील सांगितले आहे. वर्षभरात आपण ९० टक्क्यांच्या वर मुलींना परत आणतो. राज ठाकरे यांच्या काही शंका असल्यास त्याला उत्तर देऊ." (Devendra Fadnavis)
"आमची कुठलीही रणनिती नाही. याउलट या अधिवेशनात भरपूर चर्चा सुरु आहे, आपण अनेक बिले मंजूर केली, याचा मला आनंद आहे. चर्चा सुरु आहे तर त्याचा आनंद मानला पाहिजे. पायऱ्यांवर आंदोलन करायचे आणि चर्चेत भाग घ्यायचा नाही याला लोकशाहीत स्थान नाही. त्यामुळे विरोधक जेवढी जास्तीत जास्त चर्चा करतील तेवढे चांगले आहे," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.
मालकी हक्काच्या पट्ट्याचे नागपूर मॉडेल राज्यभरात लागू होणार
"झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना मालकी हक्काचा पट्टा मिळावा, ही गेल्या ३०-४० वर्षांपासून ही मागणी होती. २०१४ ला मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही काही निर्णय घेतले पण त्यात काही अडचणी होत्या. आता आम्ही सगळे अडथळे दूर करून सगळ्या प्रकारच्या जमिनीवर मालकी हक्का देण्याचा निर्णय केला. आज १ हजार लोकांना आम्ही मालकी हक्काचे पट्टे दिले. एकूण ५० हजार झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना मालकी हक्काचा पट्टा देतो आहोत. आठ वर्षे सर्वोच्च न्यायालयात लढून झुडपी जंगलावर बसलेल्यांनाही आम्ही मालकी हक्क पट्टा देत आहोत. त्याचे एक नागपूर मॉडेल तयार केले असून संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा जीआर लागू केला आहे. यासोबतच कच्चे घर असलेल्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पक्के घर बांधण्यासाठी पैसे देणार आहोत. एखाद्या खाजगी माणसाच्या जमिनीला जे अधिकार असतात ते सगळे अधिकार या पट्टयांना दिले आहेत," असेही त्यांनी स्पष्ट केले. (Devendra Fadnavis)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....