Thane City : ठाणे शहरात आणखी चार दिवस 50 टक्के पाणी कपात

नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

    13-Dec-2025
Total Views |
Thane City
 
ठाणे : (Thane City) ठाणे शहराला (Thane City) पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे बंधारा येथून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी वाहून आणणारी १००० मि. मि व्यासाची जलवाहिनी कल्याण फाटा येथील महानगर गॅस च्या कामांमध्ये गुरुवार दि. ११. १२. २०२५ रोजी दुपारी दुसऱ्या ठिकाणी पुन्हा नादुरुस्त झाली आहे. पाणीपुरवठा विभागामार्फत जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे , मात्र जलवाहिनी जुनी व प्रिस्ट्रेस काँक्रीट पद्धतीची असल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी अजून चार दिवस वेळ लागण्याची शक्यता आहे. या कारणामुळे ठाणे शहरात होणारा पाणीपुरवठा कमी झाला असून शहरांमध्ये ५० टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे.(Thane City)
 
हेही वाचा : NKT Tech Fest 2025 : एन के टी टेक फेस्ट 2025 जल्लोषात संपन्न; ५०० हून अधिक विद्यार्ह्यांचा उत्स्फूर्त सहभाग 
 
शहरामध्ये पाणी वितरणाचा समतोल ठेवण्यासाठी दि. १५. १२. २०२५ पर्यंत प्रत्येक भागास दिवसातून १२ तास झोनिंग पद्धतीने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना कमी प्रमाणात व अनियमित पाणीपुरवठा होईल. (Thane City) तरी नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा व महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात येत आहे.(Thane City)