मुंबई : ( Sumitratai Mahajan ) " विकसित भारताचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची पिढी तत्परतेने काम करते आहे. या पिढीला सुमित्राताईंच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. खऱ्या अर्थाने राजकारणातील प्रेरणा मूर्ती म्हणजे सुमित्राताई महाजन." असे मत भाजपचे माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले. ब्राह्मण सेवा मंडळाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी लोकसभेच्या माजी सभापती पद्मभूषण सुमित्राताई महाजन यांच्या कार्याचा गौरव करताना ते म्हणाले की " सुमित्रा ताईंची ओळख म्हणजे एक रुजू, सात्विक, आणि सर्वांगीण व्यक्तिमत्व. परंतु वेळ आल्यावर त्यांनी कणखरपणे निर्णय सुद्धा घेतले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत मागची अनेक वर्ष इंदूरला सर्वात स्वच्छ शहराचा किताब मिळतो आहे. याचे देखील श्रेय सुमित्रा ताईंना जाते. त्यांनी आपल्या कार्यातून सातत्याने एक संस्कार रुजवला. आपल्या कार्यकाळामध्ये सुमित्रा त्यांनी तरुण खासदारांचे मेंटोरिंग सुद्धा केले होते. त्यांच्या दिशादर्शक व्यक्तिमत्त्वामुळे त्यांनी सशक्त पिढीला आकार दिला. "
दि. १० डिसेंबर रोजी, दादरच्या ब्राह्मण सेवा मंडळाचा ब्रह्मभूषण पुरस्कार २०२५ हा ब्राह्मण सभा मंडळाच्या बहुतुले सभागृहात पार पडला. या प्रसंगी पद्मभूषण सुमित्राताई महाजन, भाजपचे माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, मंडळाचे उपाध्यक्ष अनिरुद्ध गोडसे, आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष अनिरुद्ध गोडसे यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सुमित्रा ताईंना ब्रह्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सुमित्रा ताई म्हणाल्या की आम्ही कार्यकर्त्याच्या नात्याने सातत्याने केवळ काम करत राहिलो. मी स्वतःला भाग्यवान समजते की तात्याराव सावरकरांना ऐकण्याचे मला भाग्य लाभलं, दत्तोपंत ठेंगडी यांचे मार्गदर्शन मला लाभलं. मोठं होताना चांगलं ऐकणं खूप महत्त्वाचा आहे. समाजामध्ये आपल्याला चांगली माणसं घडवायची असतील तर आई-वडिलांनी मुलांवर संस्कार करणे आवश्यक आहे."
मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.