मुंबई : ( Vikas Bhave’s New Book Launched ) रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आणि संवेदना प्रकाशन, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ कवी विकास भावे यांच्या ओठावरली गाणी या दुसऱ्या पुस्तकाचे शानदार प्रकाशन ज्येष्ठ कवी, गीतकार अशोक बागवे यांचे हस्ते नुकतेच ठाण्यातील रोटरी हॉल, नौपाडा येथे संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुण्या लोकप्रिय ज्येष्ठ गायिका मधुवंती दांडेकर उपस्थित होत्या. तसेच व्यासपीठावर संवेदना प्रकाशनचे नितीन हिरवे, रोटरी संस्थेचे माजी अध्यक्ष श्री जितेंद्र भांबुर्डे, अनघाचे अमोल नाले, कवी, चित्रकार रामदास खरे उपस्थित होते.
यावेळी लोकप्रिय ज्येष्ठ गायिका मधुवंती दांडेकर उपस्थित होत्या. तसेच व्यासपीठावर संवेदना प्रकाशनचे नितीन हिरवे, रोटरी संस्थेचे माजी अध्यक्ष जितेंद्र भांबुर्डे, अनघाचे अमोल नाले, कवी, चित्रकार रामदास खरे उपस्थित होते. तृप्ती भावे आणि सहकाऱ्यांनी पुस्तकातील काही भावगीते सादर केली. नितीन हिरवे यांनी प्रास्ताविक केले. विकास भावे यांनी आपल्या मनोगतातून या पुस्तक निर्मितीमागची आपली भूमिका मांडली. यावेळी अशोक बागवे म्हणाले की "कवीचे शब्द हे कागदावर मृत असतात, संगीतकार त्याला अमृत पाजतात आणि हे शब्दसुर मंथनातून कसे बाहेर आले ते गायक आपल्या गळ्यातून सांगतात. त्यामुळे गाणं म्हणजे ही एक प्रकारची त्रिगुणात्मक सृष्टी आहे.
'ओठावरील गाणी' हा मौलिक ग्रंथ म्हणजे मर्मबंधातली ठेव आहे. हा ग्रंथ नवीन पिढीपर्यंत जाण्यासाठी विद्यापीठाला अभ्यासाला लावणे आवश्यक आहे." तर प्रमुख पाहुण्या गायिका मधुवंती दांडेकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त झाल्या "शंभर अजरामर गाण्यांचं रसग्रहण कवी विकास भावे यांनी उत्तम पद्धतीनं केलं आहे. त्यांना आपल्या वडिलांकडून म्हणजेच कविश्रेष्ठ म. पां. भावे यांच्याकडून काव्याचा वारसा मिळाला आहे. मी स्वतः गायिका असल्याने गीताचा भावार्थ समजून घेणं किती आवश्यक आहे मी जाणते.
भावसंगीताचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचले पाहिजे.' त्यांनी सोबत काही नाट्यगीते देखील पेश केली. कवी,चित्रकार रामदास खरे यांनी चाळीस वर्षांपूर्वीचा आकाशवाणीचा सुवर्ण काळ किती सुंदर होता, गाणी कशी रसिकांच्या हृदयात रुजली याबद्दलचे विचार मांडले. संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके निवेदन निवेदिका प्रतीक्षा बोर्डे यांनी केले. कवी विकास भावे यांनी उपस्थितांचे आभार मानले. ठाण्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होती.
मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.