Vidya Prasarak Mandal : विद्या प्रसारक मंडळाचा ९० वर्षांचा गौरवशाली प्रवास भव्य सोहळ्यात साजरा
01-Dec-2025
Total Views |
ठाणे : (Vidya Prasarak Mandal) ठाण्याच्या प्रतिष्ठित विद्या प्रसारक मंडळाच्या ९० वर्षाच्या वाटचाली निमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्या प्रसारक मंडळाचे (Vidya Prasarak Mandal) अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, डॉ.महेश बेडेकर, वीपीएम संस्थेचे सर्व व्यवस्थापन समिती सदस्य, हितचिंतक व स्नेही उपस्थित होते. दीपप्रज्वलनानंतर जोशी बेडेकर महाविद्यालयातील विद्यार्थिनी निधी खाडीलकर हिने सरस्वती वंदना सादर करून कार्यक्रमाची सुंदर सुरुवात केली.ह्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा राजेंद्र पाटणकर यांनी सांभाळली.
“लोक शिक्षणापर्यंत पोहोचू शकत नसतील, तर शिक्षण लोकांपर्यंत पोहोचवू” या तत्वज्ञानावर आधारित विद्या प्रसारक मंडळाच्या (Vidya Prasarak Mandal) ९० वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेणारा माहितीपटही या प्रसंगी प्रदर्शित दाखविण्यात आला. माहितीपटातून संस्थेची प्रदीर्घ वाटचाल,समाजकारणातील व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान आणि शिक्षणविस्तारातील भूमिका प्रभावीपणे मांडण्यात आली.कार्यक्रमाचा सांस्कृतिक भाग अत्यंत मंत्रमुग्ध करणारा ठरला. प्रख्यात गायक ओंकार दादरकर यांनी तबला वादक रोहित देव, हार्मोनियम वादक अनंत जोशी आणि पखवाज वादक प्रथमेश तारळकर यांच्या साथीने राग शंकरच्या तीन बंदिशी सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यानंतर पंडित राकेश चौरसिया यांच्या बासरीचे सुमधुर सूर आणि पंडित मुकुंदराज देव यांच्या तबल्याच्या तालांनी संध्याकाळ अधिक अविस्मरणीय केली.विद्या प्रसारक मंडळांतर्गत कार्यरत सर्व शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी तसेच विद्यार्थी उत्साहाने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. जवळपास १००० प्रेक्षकांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला भव्यतेची प्राप्ती झाली. याप्रसंगी विद्या प्रसारक मंडळ (Vidya Prasarak Mandal) व संबंधित महाविद्यालय शाळांमध्ये आजपर्यंत भेट दिलेल्या महत्त्वाच्या प्रसिद्ध व्यक्तींच्या छायाचित्रणांचे दृकश्राव्य माध्यमातून सादरीकरण करण्यात आले. (Vidya Prasarak Mandal)
गोठ्यातून सुरू झालेल्या या शिक्षण संस्थेची कीर्ती आज थेट परदेशात लंडनपर्यंत पोहोचली आहे. व्हीपीएमच्या लंडन अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड रिसर्चपासून ते ठाण्यातील कला, वाणिज्य, विज्ञान, मॅनेजमेंट, कायदा, अभियांत्रिकी आणि पॉलीटेक्निक अशा विविध शाखांच्या महाविद्यालयांपर्यंत संस्थेचे कार्यक्षेत्र अत्यंत व्यापक झाले आहे. तसेच कोकणातील महर्षी परशुराम कॉलेज ऑफ इंजिनियरिंग हे त्या व्यापक शैक्षणिक साम्राज्याचे आणखी एक महत्त्वाचे केंद्र ठरले आहे.यासोबतच, प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांचे जाळेही संस्थेने उभारले असून, शिक्षणाचा प्रकाश समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. काही गरजू विद्यार्थ्यांसोबत गोठ्यातून सुरू झालेला हा प्रवास आज १७,००० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने मंडळाच्या जोशी बेडेकर स्वायत्त महाविद्यालयाच्या अंतर्गत “अतुल्य इनक्लुसिव्ह सेल” उपक्रमही कार्यरत आहे, जो विशेषतः दिव्यांग विद्यार्थ्यांना सहाय्य, मार्गदर्शन आणि शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी समर्पित आहे. (Vidya Prasarak Mandal)
१९३५ पासून कार्यरत असलेल्या विद्या प्रसारक मंडळाच्या (Vidya Prasarak Mandal) ९० वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचे स्मरण करणारा हा कार्यक्रम शिक्षण, संस्कृती आणि कलाविष्कार यांचा सुंदर संगम ठरला. शिक्षणाचा दीप प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प कायम ठेवत, संस्था आगामी काळातही समाजाच्या विकासासाठी तत्पर राहील, असा विश्वास या कार्यक्रमातून अधोरेखित झाला.या पुढील काळात अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस यावेळी डॉ. महेश बेडेकर यांनी बोलून दाखवला.