नवी दिल्ली : (Local Body Elections) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये ओबीसी आरक्षणासंबंधी सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. शुक्रवार, दि. २८ रोजी पुढील सुनावणी होणार आहे. (Local Body Elections)
ओबीसी आरक्षणासंबंधीच्या याचिकेवर मंगळवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी याप्रकरणात आणखी वेळ वाढवून देण्याची मागणी केली. त्यानुसार, आता शुक्रवारी पुढील सुनावणी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच आवश्यकता वाटल्यास या प्रकरणावर मोठे खंडपीठ स्थापन करण्याचे संकेतही न्यायालयाने दिल्याची माहिती आहे. (Local Body Elections)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये इतर मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) सरसकट २७ टक्के आरक्षण लागू करण्यात आल्याने अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर गेली आहे. याविरोधात सर्वोच्च याचिका दाखल झाली होती. आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांवर टांगती तलवार आहे. लवकरच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणूकांवर याचा परिणाम होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. (Local Body Elections)
निवडणूका निर्विघ्नपणे पार पडतील अशी अपेक्षा
"निवडणूका सुरु झाल्या आहेत. सगळी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून २ तारखेला मतदान आहेत. त्यामुळे या निवडणूका निर्विघ्नपणे पार पडण्याकरिता असलेली विनंती सर्वोच्च न्यायालय मान्य करेल आणि सर्वोच्च न्यायालय हे समजून घेतील, अशी अपेक्षा आहे. आजही बोलताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबद्दल सकारात्मक टिपण्णी केली आहे. तसेच जुन्या निर्णयाचे मोठ्या खंडपीठाने पुनरावलोकन करावे, अशीही टिपण्णी त्यांनी केली. त्यामुळे या निवडणूका निर्विघ्नपणे पार पडतील अशी अपेक्षा आहे. पण शेवटी हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाला घ्यायच्या असल्याने यावर जास्त बोलू शकत नाही. संपूर्ण ओबीसी आरक्षणासहितच निवडणूका झाल्या पाहिजे, अशीच भूमिका राज्य सरकारने यापूर्वी घेतली आहे." (Local Body Elections)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....