मुंबई : (Navnath Ban) देवेंद्र फडणवीस दरिंदा नाही, तर पोशिंदा असून काँग्रेसची आगरबत्ती हर्षवर्धन सपकाळ यांच्यामुळे विझली आहे, अशी टीका भाजपचे माध्यमप्रमुख नवनाथ बन (Navnath Ban) यांनी केली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले. नवनाथ बन (Navnath Ban) म्हणाले की, "महाराष्ट्राच्या राजकारणात कोण दरिंदा आहे आणि कोण पोशिंदा यावर जनतेने विधानसभेच्या निवडणूकीत शिक्कामोर्तब केले आहे. देवेंद्र फडणवीस हे पोशिंदा आहेत म्हणून त्यांना जनतेने तिसऱ्यांदा निवडून दिले. हर्षवर्धन सपकाळ हे आपली अगरबत्ती कुठे लागली नसल्याने प्रसिद्धीसाठी अशी टीका करतात. देवेंद्रजींवर अशी टीका करणे म्हणजे हर्षवर्धन सपकाळ यांची वैचारिक दारिद्र्यता आहे. ही त्यांची दिवाळखोरी आहे. काँग्रेस पक्षाची अशी अवस्था होण्यामागे सपकाळ हेच जबाबदार आहेत," असे ते म्हणाले. (Navnath Ban)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....