मुंबई : ( Bihar Assembly Election Result 2025 ) बिहार निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहे. एनडीए आणि महागठबंधन यांच्यामध्ये विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडले. आज (दि. १४) सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरु आहे. अंतिम फेरीतील मतमोजणी झाल्यानंतर अंतिम निकाल हाती येईल. प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर हिने अलिनगर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार, मैथिली ठाकूर ही आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
१४ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिध्द लोकगायिका मैथिली ठाकूर हीने भाजपात प्रवेश केला होता, तिला अलिनगर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी भाजपने तिकीट दिले होते. तिच्या विरोधात राजदने बिनोद मिश्रा यांना रिंगणात उतरवले होते. आता जसजशी मतमोजणी पुढे सरकत आहे तसेतसे मैथिली बिहारच्या अलिनगर मतदारसंघातून जिकण्यांची शक्यता वाढत आहे.
तिच्या विरोधात असलेले RJD चे बिनोद मिश्रा हे ४ हजार मतांनी पिछाडीवर असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. आता मैथिली ठाकूर बिहारच्या अलिनगरमध्ये आपल्या लोकप्रियता यशामध्ये बदलू शकते का, याकडे सर्वाचेच लक्ष वेधले आहे. 'मी जिंकली तर अलीनगर हे नाव बदलून सीतानगर करणार असे तिने नुकतेच वक्तव्य केले होते. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला मिळणारया आघाडीमुळे तिने बधाई गीत गात आपला आनंद व्यक्त केला आहे.
कोण आहे मैथिली ठाकूर?
मैथिली ठाकूर ही भारतीय शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीताची प्रशिक्षित भारतीय पार्श्वगायिका आहे.
८ मार्च २०२४ रोजी झालेल्या राष्ट्रीय निर्माते पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सांस्कृतिक राजदूत हा पुरस्कार तिला देण्यात आला होता.
तिने आतापर्यत अनेक गाणी गाऊन प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.