अखेर नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला ; ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन

Total Views |

नवी मुंबई : भारतातील नगर नियोजन व विकास या क्षेत्रात अग्रणी असलेल्या सिडको प्राधिकरणाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद केला जाईल असा सुदीन समीप आला आहे. येत्या ८ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. त्यासाठी सिडकोसह सुंपर्ण राज्य सरकार महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या विकासात गरुड झेप घेण्यास सज्ज झाले असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल मटाशी बोलताना म्हणाले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून त्याचे उद्घाटन येत्या ८ ऑगस्ट रोजी होणार आहे. दुपारी २.४० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान नवी मुंबई विमानतळावर उतरणार आहे. त्यानंतर, रन-वे तसेच टर्मिनल-१ इमारतीची पाहणी केल्यावर ते नागरिकांशी संवाद साधणार असल्याचे विजय सिंघल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. उद्घाटनानंतर विमानतळ परिसर सीआयएसएफच्या ताब्यात जाणार असून प्रत्यक्षात प्रवासी वाहतूक डिसेंबर २०२५ पासून सुरू होणार असल्याचे ते म्हणाले.

तब्बल १९ हजार ६४७ कोटी रुपये खर्च विमानतळाच्या पहिल्या टफ्फ्याच्या उभारणीसाठी झाला आहे. तर चार टर्मिनल्स उभारण्यासाठी तब्बल १ लाख कोटी रुपये खर्च प्रस्तावित असल्याचे ते म्हणाले. सुमारे ११६० हेक्टर जमिनीवर तयार करण्यात आलेले हे विमानतळ देशातील पहिले ग्रीनफील्ड विमानतळ असणार आहे. ३५० विमानांची पार्किंग क्षमता या विमानतळाची आहे. एकूण ४ टर्मिनल्स उभारण्यात येणाऱया या विमानतळाची वार्षिक ९ करोड प्रवासी वाहतूक आणि ३.२५ दशलक्ष टन मालवाहतूकीची (कार्गो) क्षमता असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, मुंबई विमानतळापेक्षा दुफ्पट क्षमता नवी मुंबई विमानतळाची असून विमानतळ प्रकल्पामुळे १ लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. विशेषत रायगड, ठाणे, कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना याचा फायदा होईल अशी अपेक्षा विजय सिंघल यांनी व्यक्त केली.

नवी मुंबई विमानतळाची वैशिष्ट्ये

या विमानतळावर निर्माण करण्यात आलेल्या पायाभूत सुविधांमध्ये ३.७ कि.मी लांबीच्या दोन समांतर कोड-४ एफ धावपट्ट्या निर्माण करण्यात आल्या आहेत. ज्यांना वाढीव कार्यक्षमतेसाठी दुहेरी समांतर टॅक्सीवे आणि जलद एक्झिट टॅक्सीवेद्वारे जोडले गेले आहे. विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात दक्षिण रनवे कार्यान्वित होणार आहे.

पहिल्या टफ्फ्यांतर्गत नवी मुंबई विमानतळावर २९ कॉन्टॅक्ट एअराफ्ट स्टँड, १३ रिमोट कमर्शियल स्टँड , ७ कार्गो स्टँड आणि ३८ जनरल एव्हिएशन (जीए) स्टँड सह कार्यान्वित होणार असून ज्यावर१५ जीए हैंगर्स, तसेच १,५०० कार, २० बसेस आणि २० ट्रकसाठी पार्किंग सुविधा उपलब्ध असणार आहे.

तसेच अति महत्वाची व्यक्ती आणि खाजगी विमान वाहतुकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अंतिम टप्प्यात जवळजवळ १०० जनरल एव्हिएशन विमान स्टँड असलेले एक पूर्ण विकसित जीए टर्मिनल बांधण्याची योजना असल्याची माहिती विजय सिंघल यांनी दिली.

जलवाहतूकीने जोडले जाणारे मल्टीमॉडेल विमानतळ

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ राष्ट्रीय महामार्ग, मुख्य शहरी रस्ते, उपनगरीय रेल्वे, मेट्रो व जल वाहतुकीद्वारे जोडले जाणार आहे. जल वाहतुकद्वारे जोडले जाणारे हे देशातील पहिले विमानतळ असणार आहे. नवी मुंबई विमानतळाला मुंबई महानगर प्रदेशाच्या प्रत्येक कोपऱयाशी जोडण्यासाठी एक अखंड मल्टी-मॉडेल ट्रान्सपोर्ट नेटवर्क विकसित केला जात आहे. तसेच अटल सेतू, उलवे कोस्टल रोड आणि प्रस्तावित ठाणे- नवी मुंबई विमानतळ उन्नत मार्ग, सिग्नल-मुक्त रस्ते कनेक्टिव्हिटी, तर मेट्रो लाईन 8द्वारे मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ एकमेकांशी २०३१ पर्यंत जोडले जाणार आहे.


मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com