मुंबई : ( Keshav Upadhye ) हिंदूंच्या हिताचा मुद्दा समोर आला की, जळफळाट करणे हा उबाठा गट, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या फसव्या राजकारणाचा डाव आहे, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये ( Keshav Upadhye ) यांनी केली.
केशव उपाध्ये ( Keshav Upadhye ) म्हणाले की, "हिंदूहिताच्या कोणत्याही बाबीस विरोध करून थयथयाट केला की, तेवढ्यावरच मुस्लिम आणि अन्य अल्पसंख्याक समाज खुश होतो ही त्यांची धारणा हिंदूद्वेषास खतपाणी घालतेच, पण यातून मुस्लिम वा अन्य कोणत्याही अल्पसंख्याक समाजघटकाचे काहीही हित साधत नाही. केवळ हिंदूविरोध व्यक्त करून अल्पसंख्यांकांची मते पदरात पडत असल्याने या समाजाच्या सर्वांगीण विकासाचा कोणताही कार्यक्रम उबाठा, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे नाही. तसेच त्यांनी या समाजाचे काहीही भले केलेले नाही," असे ते म्हणाले.
"ज्यावेळी हलाला सर्टीफाईड घरांच्या जाहिराती झळकत होत्या त्यावेळी काँग्रेस, उबाठा आणि शरद पवार गट चिडीचूप बसले होते. मात्र, एका आमदाराने केवळ हिंदू दुकानातूनच दिवाळीची खरेदी करा असे आवाहन करताच, हीच मंडळी जणू आग लागल्यासारखी थयथयाट करीत आहेत. जळफळाट आणि थयथयाट करून राजकारणाचा खेळखंडोबा आणि समाजाची फसवणूक करत आहेत," अशी टीकाही केशव उपाध्ये ( Keshav Upadhye ) यांनी केली.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....