सैफ अली खानवर हल्ला; घरातील नोकराची संशयास्पद भूमिका
16-Jan-2025
Total Views |
मुंबई : अभिनेते सैफ अली खान यांच्या राहत्या घरात घुसून त्यांच्यावर केल्या गेलेल्या हल्लाने मुंबईतील सुरक्षा आणि अभिनेता सैफ अली खान यांच्या सुरक्षिततेविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सैफ अली खान हे मुंबईतील वांद्रे येथील आपल्या निवासस्थानी एका आक्रमणात गंभीरपणे जखमी झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, हा हल्ला घडला तो एक वादावर आधारित होता. हा वाद सैफ अली खान यांच्या घरातील नोकर आणि हल्लेखोर यांच्यात झाला होता. सैफ अली खान यांनी आपल्या नोकराला वाचवण्यासाठी हस्तक्षेप केला, त्यावेळी हल्लेखोराने त्यांच्यावर चाकूने वार केले.हल्ल्यात सैफ अली खान यांना पाठीच्या भागात आणि मान भागात गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांच्या शरीरावर तीन ते चार चाकूचे वार असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या त्यांना लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगितले गेले आहे. डॉक्टर्स त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सैफ अली खान यांना उपचार सुरू झाल्यापासून जास्त सुधारणा होत असल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांनी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत त्यांच्याकडून चौकशी सुरू केली आहे. पोलिसांना शंका आहे की, सैफ अली खान यांच्या घरातील नोकराने हल्लेखोराला घरात प्रवेश करण्याची संधी दिली असावी. त्यामुळे त्या नोकराला पोलिसांनी तपासासाठी बोलावले आहे. पोलिस तपासामध्ये कदाचित घरातील नोकराचे हल्लेखोराशी पूर्वीचे काही संबंध असू शकतात, अशी शंका व्यक्त केली जात आहे. सुरक्षा संबंधित उपायांवरही विचारले जात आहेत, कारण हा हल्ला एका उच्चभ्रू परिसरातील घरात घडला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या सुरक्षा व्यवस्थेवर चर्चा सुरू आहे.
सैफ अली खान यांच्या कुटुंबियांना या घटनेत काहीही झालेले नाही, आणि त्यांच्या पत्नी करीना कपूर खान आणि मुलांचे स्वास्थ्य ठीक आहे.या घटनेने मुंबईतील सुरक्षा व्यवस्थेसमोर नवा प्रश्न उभा केला आहे, तसेच बॉलिवूडच्या सुरक्षा बाबींवर विचार करण्याची आवश्यकता प्रकट केली आहे.