शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झालीये! भास्कर जाधवांचा पक्षाला घरचा आहेर

    15-Jan-2025
Total Views |
 
Bhaskar Jadhav
 
मुंबई : शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झाली आहे, असे वक्तव्य उबाठा गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केले आहे. चिपळूणमधील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. दरम्यान, त्यांच्या वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
 
हे वाचलंत का? -  परळीत व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद! वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ आंदोलन करणार
 
भास्कर जाधव म्हणाले की, "काही पदाधिकारी तर दहा-दहा पंधरा-पंधरा वर्षांपासून एका जागेवर बसलेले आहेत. माझ्या पदाला कुणीही हात लावू शकत नाही. मी कुठल्यातरी नेत्याची मर्जी सांभाळली की, माझे पद शाबूत, अशी त्यांची समजूत झाली आहे. त्यांना पदावरून बाजूला करण्याची आमच्यात हिंमत नाही. शाखाप्रमुख वगैरे या पदांचा कालावधी जर निश्चित केला तर तेवढ्या कालावधीत काम करण्याकरिता ते स्पर्धा करतील. आपल्या पक्षाची आता जवळजवळ काँग्रेसच झाली आहे. हे बोलताना वेदना होतात," असे ते म्हणाले.
 
भास्कर जाधव यांची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, "माझी क्लिप मध्येच कट करण्यात आली. त्याच्या मागचा आणि पुढचा संदर्भ ऐकावा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंपासून काम केलेल्या शिवसैनिकांचे म्हणणे आणि माझे म्हणणे काय आहे, हे मी स्पष्टपणे मांडले. एकदा एखादे भाष्य केल्यावर मी माझे शब्द मागे घेत नाही."