वाल्मिक कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक!

    14-Jan-2025
Total Views |
 
Parli
 
बीड : वाल्मिक कराडवर मकोका लावल्याची बातमी पुढे आली असतानाच आता कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आली आहे. परळी शहरात मोठे आंदोलन सुरु असून सर्व दुकाने बंद करण्यात आली आहे.
 
हे वाचलंत का? - ब्रेकिंग! वाल्मिक कराडवर मकोका
 
मंगळवारी सकाळपासूनच वाल्मिक कराडची आई, कुटुंबिय आणि त्याच्या समर्थकांकडून ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. परळी शहर पोलिस ठाण्याच्या बाहेर बसून ठिय्या आंदोलन सुरु आहे. अनेक महिला पोलिस ठाण्याबाहेर घोषणा देत आंदोलन करत आहेत. तसेच काही समर्थक पाण्याच्या टाकीवर चढून ठिय्या आंदोलन करत आहेत. दरम्यान, त्यानंतर वाल्मिक कराडवर मकोका लावल्याची बातमी सर्वत्र परसताच परळी बाजारपेठ बंद करण्यात आली आहे.