ब्रेकिंग! वाल्मिक कराडवर मकोका

    14-Jan-2025
Total Views |

Walmik Karad 
 
बीड : दोन कोटी रुपये खंडणीप्रकरणी अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मंगळवार, १४ जानेवारी रोजी केज कोर्टात याप्रकरणाची सुनावणी पार पडली.
 
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग आहे का, याचा तपास करण्यासाठी सीआयडीला त्याचा ताबा हवा आहे. दरम्यान, वाल्मिक कराडचा ताबा मिळवण्यासाठी सीआयडीने कोर्टात अर्ज केला आहे. वाल्मिक कराडवर हत्येच्या गुन्ह्यात कट रचल्याचा आरोप एसआयटीकडून करण्यात आला आहे.