मुंबई : धारावीमध्ये ठरवून दगडफेक झाली असून कट्टरपंथींच्या गुंडांचा लँड जिहादचा डाव आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्यांनी दिली आहे. धारावीमध्ये मशीदीचा अवैध भाग पाडल्याने सध्या तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर किरीट सोमय्यांनी प्रतिक्रिया दिली.
काँग्रेस आणि ठाकरे सेना मुस्लिम समाजाला भडकवून दंगे माजवतात!
किरीट सोमय्या म्हणाले की, "धारावी येथे अनधिकृत मस्जिद बांधायची, ती वाढवायची आणि लँड जिहाद करायचं आणि हे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी सरकारी कर्मचारी आले तर मुस्लिम समाजाला भडकवून दंगे माजवण्याचे कारस्थान उद्धव ठाकरे सेना आणि काँगेसचे नेते करत आहेत. ठाकरे सेनेचे खासदार अरविंद सावंत आपल्या भाषणात सांगतात की, मस्जिदों की एफ एस आय FSI डबल कर देंगे. त्यामुळे कारवाई झालीच पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली आहे.