मशिदीचे पाडकाम रोखण्यासाठी वर्षा गायकवाड यांचं मुख्यमंत्र्यांना साकडं!

    21-Sep-2024
Total Views |
 
Varsha Gaikwad
 
मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात सध्या प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. मुंबई महापालिकेने धारावीतील एका मशिदीचा अवैध भाग पाडल्याने तिथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, खासदार वर्षा गायकवाड यांनी या कारवाईबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेत त्यांना निवेदन दिलं आहे.
 
 
 
"धारावीच्या मेहबूब-ए-सुबानिया मशिदीला आलेल्या बीएमसीच्या नोटीसबद्दल वर्षा गायकवाड मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली आणि लोकांच्या भावनांबद्दल त्यांना माहिती दिली. मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली असून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून तोडण्याचे काम बंद करण्यात येण्याचे आश्वासन दिले," अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
 
 धारावीत प्रचंड तणाव! बेकायदा मशिदीवर कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या गाड्यांची तोडफोड
 
धारावीत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून असंख्य लोक रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच खासदार वर्षा गायकवाड या धारावी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाल्या आहेत.