मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Yogi Adityanath RSS VHP) "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद आपल्या कार्याचा प्रपोगंडा आणि सेवेची सौदेबाजी कधीच करत नाही. कारण मानवसेवा ही त्यांच्यासाठी ईश्वरी सेवा आहे, असे मानून संघाचे प्रचारक, स्वयंसेवक आणि कार्यकर्ते समाजात कार्य करत असतात.", असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. पश्चिम त्रिपुरातील बारकाथल येथ सिद्धेश्वरी मंदिराचा उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
हे वाचलंत का? : जळगावात विसर्जन मिरवणूकीवर धर्मांधांची दगडफेक
उपस्थितांना संबोधत योगीज पुढे म्हणाले, "विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वात आणि पूज्य संतांच्या मार्गदर्शनाखाली ५०० वर्षांनी अयोध्येत श्रीराम मंदिराचे निर्माणकार्य पूर्णत्वास येत आहे. याने काहींना पोटदुखी होत असेल त्यात आमची चूक काय? आम्हाला आमच्या रामललाशी आस्था आहे. भारतातील जनता संतुष्ट कशी राहिल, यासाठीच आमचे कार्य सुरु आहे."
काशीचा उल्लेख करत ते म्हणाले, "काशी, अयोध्या, मथुरा हे सनातन हिंदू धर्माचे मानबिंदू आहेत. आज नाहीतर उद्या ही तिन्ही ठिकाणं पुन्हा एकदा हिंदू धर्म आणि आस्थेचे प्रतिक म्हणून भव्य रुपात येणाऱ्या काळात उभे राहिलेले दिसतील. यात कुठलीच शंका नसावी."