मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Jalgaon Dagadphek News) राज्यात हिंदू सणांना गालबोट लावण्याचा प्रयत्न गणेशोत्सवादरम्यानही झाल्याचे दिसून आले. जळगाव येथे मंगळवार, दि. १७ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनासाठी निघालेल्या मिरवणूकीवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. यात काही तरुण जखमी झाले असून पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
जळगावच्या जामोद परिसरात रात्री ८ च्या सुमारास सदर घटना घडल्याची माहिती मिळत आहे. चौभारा, वायली वेस भागातील गणतपी मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले असता अचानक काही अंतरावर एका इमारतीच्या गच्चीवरून दगडफेक सुरु झाली. यात काही तरुण जखमी झाले. सुमारे अर्धा तास दगडफेक चालल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी केलेल्या हस्तक्षेपानंतर चिघळलेली परिस्थिती नियंत्रणात आली.
भिवंडीत विसर्जनावेळी गणेश मूर्तीवर दगडफेक!
भिवंडीच्या वंजरपट्टी नाका येथे हिंदुस्थानी मशिदीजवळील काही धर्मांधांनी मंगळवार, दि. १७ सप्टेंबर रोजी विसर्जनावेळी गणेश मूर्तीवर दगडफेक केली. दरम्यान दोन गटांमध्ये हाणामारी झाली, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांनी सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी गणेश मंडळाकडून करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही जणांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे.