मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (RSS Baal Olympic) लहान मुलांनी ऑलिम्पिकची व त्यातील खेळांची माहिती व्हावी या संकल्पनेतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने 'बाल ऑलिम्पिक' स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. गाजियाबाद इंदिरापुरममध्ये हरनंदी महानगर तर्फे आयोजित या स्पर्धेत महानगरातील सर्व शाखांमधून १७३७ स्वयंसेवक सहभागी झाले होते. बाल ऑलिम्पिकमध्ये कबड्डी, लांब उडी, विविध प्रकारच्या शर्यती, भालाफेक, लक्ष्यभेद, टग ऑफ वॉर आणि बॅडमिंटन यासह १३ प्रकारच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.