काँग्रेसच्या आरोपांवर सेबी प्रमुख म्हणाल्या; "विशिष्ट हेतूने प्रेरित.....!"

    14-Sep-2024
Total Views |
sebi chief on congress accused
 

मुंबई :       अमेरिकास्थित हिंडेनबर्ग रिसर्चने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया(सेबी) प्रमुख माधबी बुच यांच्यावर आरोप केले आहेत. या आरोपांना सेबी प्रमुख माधबी बुच यांनी प्रत्युत्तर दिले असून आरोप खोटे, दुर्भावनापूर्ण आणि काही विशेष हेतूने प्रेरित असल्याचे सांगत आरोप फेटाळले आहेत.




दरम्यान, काँग्रेसच्या आरोपांवर भाष्य करताना बुच दाम्पत्याने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माधबी बुच यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असताना मात्र काँग्रेसच्या आरोपानंतर त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने सातत्याने अनेक पत्रकार परिषद घेऊन बुच दाम्पत्यावर गंभीर आरोप केले होते.

सेबी प्रमुख बुचांनी सांगितले की, त्यांच्या आयकर परताव्याच्या तपशीलांचा तपशील 'बेकायदेशीरपणे' प्राप्त केला गेला आहे. तसेच, आपल्याविरोधात खोटी प्रचार करण्यासाठी तथ्ये जाणूनबुजून हाताळली गेली आहेत, असेही बुच म्हणाले. दरम्यान, काँग्रेसच्या आरोपांबाबत मौन भंग करत सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (सेबी) अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.