'World Best Companies'मध्ये भारतीय आयटी कंपन्यांचा बोलबाला
14-Sep-2024
Total Views |
मुंबई : जगातील सर्वोत्तम कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. जागतिक टाईम्स मासिकाकडून जगातील टॉप-१००० सर्वोत्तम कंपन्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. देशातील नामांकित आयटी क्षेत्रातील कंपनी एचसीएल टेक या कंपनीने ११२ व्या स्थानी झेप घेतली आहे.
दरम्यान, टाईम्सच्या यादीत भारतीय कंपन्यांचा जलवा दिसून आला असून एचसीएल टेक या यादीत ११२ व्या क्रमांकावर तर इन्फोसिस ११९ व्या आणि विप्रो १३४ व्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर, महिंद्रा समूह या यादीत १८७ व्या क्रमांकावर आहे. एकंदरीत, भारतीय सरकारी कंपन्यांचा जगात डंका असून गुंतवणूकदारांना लवकरच लॉटरी लागण्याची शक्यता आहे.
टाईम्स मासिकाने प्रसिध्द केलेल्या यादीत एकूण २२ भारतीय कंपन्यांचा समावेश असून यात आयटी कंपन्या, दोन सरकारी बँका आणि दोन सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांचा समावेश आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ५१८व्या तर आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँक अनुक्रमे ५२५ व ५५१ व्या क्रमांकवर स्थान मिळविले आहे.