जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद शेवटचा श्वास घेत आहे - पंतप्रधान मोदी

    14-Sep-2024
Total Views |
pm narendra modi jammu rally
 

नवी दिल्ली :      आगामी काळात जम्मू आणि काश्मीरमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणूका जाहीर झाल्यानंतर विविध पक्षांकडून जाहीर सभा घेण्यात येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक रॅलीला संबोधित केले. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद शेवटचा श्वास घेत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.


दरम्यान, मोदी सरकारने घराणेशाहीच्या राजकारणाचा सामना करण्यासाठी काश्मीरसारख्या सुंदर प्रदेशाचा नाश केला आहे. येथील दहशतवाद लवकरच संपुष्टात येणार असून शेवटचा श्वास घेत आहे. आपण एकत्र येत जम्मू-काश्मीरला देशाचा एक सुरक्षित आणि समृद्ध भाग बनवू, असा संकल्प पंतप्रधान मोदींनी निवडणूक रॅलीत केला आहे.

जम्मू प्रदेशातील डोडा जिल्ह्यात भाजप उमेदवारांच्या समर्थनार्थ आयोजित निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आम्ही आणि तुम्ही मिळून जम्मू-काश्मीरला देशाचा एक सुरक्षित आणि समृद्ध भाग बनवू. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान दि. १८ सप्टेंबर रोजी होणार असून पंतप्रधानांची ही पहिलीच निवडणूक रॅली होती.

पंतप्रधान म्हणाले, २०१४ मध्ये केंद्रात सत्तेवर आल्यानंतर लगेचच आम्ही तरुण नेतृत्व उभे करण्यावर लक्ष केंद्रित केले. स्वातंत्र्यानंतर जम्मू आणि काश्मीर हे परकीय शक्तींचे लक्ष्य बनले असे सांगताना राजकीय घराण्यांनी त्यांच्या मुलांना प्रोत्साहन दिले आणि नवीन नेतृत्व उदयास येऊ दिले नाही, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.