भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मुंबई दौऱ्यावर! लालबागच्या राजाचे दर्शन घेणार

    14-Sep-2024
Total Views |
 
J. P. Nadda
 
मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा शनिवार, १४ सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी ते लालबागच्या राजाचे दर्शन घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपने आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत जे. पी. नड्डा यांच्या दौऱ्याची सविस्तर माहिती दिली आहे.
 
हे वाचलंत का? -  वडेट्टीवार-धानोरकर वाद पुन्हा उफाळला? दिल्ली दरबारी बैठक होणार
 
जे. पी. नड्डा आपल्या मुंबई दौऱ्यात सर्वात आधी दुपारी १२.२० वाजता ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेणार आहे. त्यानंतर दुपारी १२.४० वाजता ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावरील गणरायाचे दर्शन घेतील. २.२० वाजता लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर २.४० वाजता ते चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दर्शन घेतील. त्यानंतर दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी ते वांद्रे पश्चिम गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन गणरायाचे दर्शन घेणार आहेत. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जे. पी. नड्डांचा मुंबई दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. या दौऱ्यात भाजप नेत्यांशी त्यांची बैठक होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.