'हे' तर तुमचेच कर्म! चित्रा वाघ यांची अनिल देशमुखांवर खोचक टीका

    10-Sep-2024
Total Views |
 
Deshmukh & Wagh
 
मुंबई : चार वर्षांपूर्वीची घटना कुणीही उकरुन काढली नाही. ते तुमचे कर्म आहे, अशी खोचक टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी ४ वर्षांपुर्वीची घटना उकरुण काढत माझ्याविरुध्द दिल्लीच्या मदतीने सीबीआय गुन्हा दाखल केली आहे, अशी टीका अनिल देशमुखांनी केली होती. यावर आता चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले.
 
 
 
चित्रा वाघ म्हणाल्या की, "४ वर्षांपूर्वीची घटना कुणीही उकरुन काढली नाही, ते तुमचे कर्म आहे. सारे पुरावे विधानसभेच्या रेकॉर्डवर आहेत. माध्यमांकडेही त्याचे व्हीडिओ आहेत. ज्या अधिकार्‍यावर तुम्ही दबाव टाकला त्या अधिकार्‍यानेच जबाब दिला आहे. त्यामुळे कर्म तुम्ही कराल आणि दोष आमच्या नेत्यांवर टाकाल, हे चालणार नाही," असे त्या म्हणाल्या.
 
हे वाचलंत का? -  सहानुभूती मिळवण्याचा देशमुखांचा केविलवाणा प्रयत्न; उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया
 
त्या पुढे म्हणाल्या की, "सरकारी वकील कट रचतो, गृहमंत्री एसपींवर दबाव टाकतात, त्याचे स्टींग सभागृहात येते, सीबीआय चौकशीचे आदेश हायकोर्ट देते आणि तुम्ही देवेंद्र फडणवीसांवर आरोप करणार? संवैधानिक प्रक्रियेचा आणखी किती अपमान करणार? त्यापेक्षा हिंमत असेल तर गिरीश महाजन तुम्हाला भेटले तेव्हा तुम्ही कुणाचा दबाव आहे आणि म्हणून मला खोटा गुन्हा दाखल करावाच लागेल हे सांगितले होते हे एकदा सांगून टाका," असेही त्या म्हणाल्या.