UPI पेमेंट फर्म्स शोधतायत 'डिजिटल रुपी', नेमकं प्रकरण काय?

    05-Aug-2024
Total Views |
upi payments firmseeks digital rupee


मुंबई :        गुगल पे, फोन पे आणि अॅमेझॉन पे यांसारख्या (UPI)पेमेंट कंपन्यांनी ई-रुपीद्वारे डिजिटल व्यवहार सुलभ करून भारतीय रिझर्व्ह बँके(आरबीआय)ला सहकार्य करण्यासाठी सहभाग घेणे गरजेचे आहे. दरम्यान, या पेमेंट कंपन्या आरबीआय आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)सारख्या देशातील पेमेंट प्राधिकरण यांच्याशी सहयोग करत आहेत आणि पुढील तीन ते चार महिन्यांत ई-रुपी ऍक्सेस सुरू करतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, देशातील फिनटेक कंपन्या म्हणजेच क्रेड आणि मोबिक्विक देखील पायलटमध्ये सामील होण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे अहवालात म्हटले आहे. एकंदरीत, गुगल पे, फोन पे आणि अॅमेझॉन पे यासारख्या डिजिटल पेमेंट कंपन्या आरबीआयच्या डिजिटल रुपयामध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक आहेत. पुढील तीन ते चार महिन्यांत ई-रुपी ऍक्सेस सुरू करतील अशी अपेक्षा आहे.


नामांकित पेमेंट फर्म्सना ई-रुपी व्यवहार सुलभ करण्यासाठी परवानगी देऊन अधिकाधिक वापर वाढण्याची आशा आहे. तसेच, संभाव्यत: डिजिटल व्यवहाराचे प्रमाण वाढेल, असाही अंदाज यानिमित्ताने वर्तविण्यात येत आहे. गुगल पे, फोन पे आणि अॅमेझॉन पे यासारख्या UPI पेमेंट फर्म्सचा वाटा ८५ टक्क्यांहून अधिक असून मासिक सुमारे १३ अब्ज व्यवहार या माध्यमातून हाताळले जात आहेत.

आरबीआयकडून ई-रुपीला प्रोत्साहन देत असताना डिजिटल चलनाच्या लॉन्च करण्याची कोणतीही त्वरित योजना नाही. पुढील काही वर्षांसाठी ई-रुपी प्रायोगिक स्वरुपात राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, डिसेंबर २०२२ मध्ये डिजिटल चलनाचा भाग असलेल्या ई-रुपी पायलटची सुरुवात केली. ई-रुपया व्यवहारांमध्ये सुरुवातीला वाढ झाली असली तरी, सद्यस्थितीस ते प्रमाण कमी झाले आहेत.