देशातील अग्रणी एअरलाईन सुरू करणार बिझनेस क्लाससह "ब्लूचिप' लॉयल्टी प्रोग्राम!

    05-Aug-2024
Total Views | 35
indigo airline bluechip program business class 
 

नवी दिल्ली :          देशातील एक अग्रणी विमानसेवा कंपनी असलेली इंडिगो कपंनीकडून आता बिझनेस क्लास सेवा देण्यात येणार आहे. इंडिगो कंपनी दिल्ली-मुंबई या विमान सेवामार्गाद्वारे १२ मार्गांवर बिझनेस क्लास ऑफर करणार आहे. दरम्यान, याच बिझनेस क्लास तिकीटांची किंमत १८ हजार रुपये इतकी असणार आहे. सुरुवातीस बेंगळुरू, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबाद शहरांकरिता प्रवासास सेवा देण्यात येईल, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.




दरम्यान, इंडिगो एअरलाइनला प्रीमियम फ्लायर्सचाही फायदा घ्यायचा आहे. देशातील अग्रणी विमान कंपनी नोव्हेंबरच्या मध्यापासून देशांतर्गत १२ मार्गांवर बिझनेस क्लासच्या सीट्स सुरू करेल, जे सर्व-इकॉनॉमी केबिनमधून नो-फ्रिल कॅरिअरसाठी उल्लेखनीय ठरण्याची शक्यता आहे.

इंडिगो कंपनीने नव्या बिझनेस क्लास विमानसेवेबाबत म्हटले की, शहरी भागातील वाढत्या उत्पन्नामुळे अनेकांना महागड्या गाड्या आणि लक्झरी अपार्टमेंटस् खरेदी करण्यास प्राधान्य दिले जात असताना इंडिगो प्रीमियम फ्लायर्सच्या वाढत्या संख्येचा फायदा घेण्याचा विचार करत आहे, असेही कंपनीकडून सांगण्यात येत आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, दि. १४ नोव्हेंबरपासून प्रवासासाठी तर दि. ०६ ऑगस्टपासून बिझनेस क्लास बुकिंग सुरू होईल. तसेच, तिकीटाची किंमत १८,०१८ रुपयांपासून सुरू होईल. महत्त्वाचे म्हणजे इंडिगो "ब्लूचिप' लॉयल्टी प्रोग्राम देखील सुरू करेल, जो सप्टेंबरच्या आसपास सुरू होईल, असेही कंपनीने सांगितले.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121