सचिन वाझे प्रकरणात उद्धव ठाकरेंचीही चौकशी व्हावी; केशव उपाध्येंची मागणी

    03-Aug-2024
Total Views |
 
Keshav Upadhye & Thackeray
 
मुंबई : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी सचिन वाझेला परत पोलिसात घेतले होते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. सचिन वाझेंनी अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
 
 
 
केशव उपाध्ये म्हणाले की, "अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून वसुली करत होते. सर्व गोष्टींचे पुरावे आहेत. देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सर्व कळवले, असे सचिन वाझे म्हणाले. काल परवापर्यंत अनिल देशमुख माध्यमांसमोर येऊन जे बोलत होते, त्याचा एकच अर्थ आहे, चोराच्या उलट्या बोंबा. बाकी दमदाटी, दबाव आणणे, पेन ड्राईव्ह हे किती निरर्थक होतं, हे तीनच दिवसांत बाहेर आलं," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -   सचिन वाझेंच्या देशमुखांवरील आरोपांवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
 
ते पुढे म्हणाले की, "उध्दव ठाकरे यांनीसुध्दा बोलल पाहिजे. कारण ते मुख्यमंत्री असताना वाझे यांनी त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यावर आरोप केलेत. याच सचिन वाझेला ठाकरे मुख्यमंत्री असताना परत पोलिसात घेतले. शिवाय त्याचावर टीका होऊ लागताच वाझे काय लादेन आहे का? असा प्रश्न उध्दव ठाकरे यांनी विचारला होता. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हायलाच हवी," अशी मागणी केशव उपाध्येंनी केली आहे.