सचिन वाझेंच्या देशमुखांवरील आरोपांवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
03-Aug-2024
Total Views | 111
नागपूर : सचिन वाझेंनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी माध्यमांमध्ये या बातम्या पाहिल्या असून गेले दोन दिवस नागपूरमध्ये असल्याने मला काहीही माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
"अनिल देशमुख हे त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते. सीबीआयकडे याबद्दलचे सगळे पुरावे आहेत. याबद्दल मी फडणवीसांना पत्र लिहिलं आहे. त्यात जयंत पाटील यांचंही नाव लिहिलं आहे. मी नार्को टेस्ट करण्यासाठी कधीही तयार आहे," असा आरोप सचिन वाझेंनी केला होता.
याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "सचिन वाझेबद्दल मी माध्यमांमध्ये पाहिलेलं आहे. त्यांनी मला पत्र पाठवलं आहे, असंदेखील माध्यमांनी दाखवलं आहे. पण अजून मी ते काहीही पाहिलेलं नाही. कारण मी दोन दिवसांपासून नागपूरमध्ये आहे. असं काही पत्र आलं आहे का? हे पाहिल्यानंतर मी त्यावर प्रतिक्रिया देईल. पण जे काही समोर येत आहे, त्याबाबत आम्ही योग्य ती चौकशी करू," असे ते म्हणाले.