पराभवाच्या भीतीने सचिन वाझेचा वापर सुरु : संजय राऊत
03-Aug-2024
Total Views | 37
मुंबई : निवडणूकीतील पराभवाच्या भीतीने भाजपकडून सचिन वाझेचा वापर करण्यात येत आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. सचिन वाझेंनी अनिल देशमुख त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घेत असल्याचा आरोप केला होता. यावर राऊतांनी प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत म्हणाले की, "भाजप निवडणूकीत उतरतो आहे आणि पराभवाच्या भीतीने विरोधकांवर हल्ले करण्यासाठी अशा संत माहात्म्यांचा वापर भाजप करणार असेल तर ही निवडणूक न लढताच त्यांनी पराभव मान्य केला आहे. अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले. त्याचं उत्तर देण्यासाठी फडणवीसांना तुरुंगातील प्रवक्ता लागतो. तुरुंगातील एक आरोपी भाजपचा प्रवक्ता म्हणून काम करतो आहे. राजकारणासाठी आणि निवडणूका जिंकण्यासाठी सरकारमधील काही प्रमुख लोक तुरुंगातील गुंडांचा वापर करत आहेत, हे मी वारंवार सांगतो आणि ते आता सिद्ध झाले आहे," असे ते म्हणाले.