मोठी बातमी! कोल्हापूरात बदलापूर घटनेची पुनरावृत्ती, चिमुकलीवर अत्याचार करून हत्या
22-Aug-2024
Total Views |
कोल्हापूर : एकीकडे बदलापूरमधील लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता कोल्हापूरमधूनही अशीच एक घटना पुढे आली आहे. कोल्हापूरमध्ये एका १० वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरमध्ये १० वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. बुधवारपासून ही मुलगी बेपत्ता होती. त्यानंतर गुरुवारी घराजवळच तिचा मृतदेह आढळला असून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.