मोठी बातमी! जरांगेंसह संभाजीराजेही एकत्र निवडणूक लढवणार!

    14-Aug-2024
Total Views |
 
Jarange & Sambhajiraje
 
सोलापूर : मनोज जरांगे आणि संभाजीराजे छत्रपती एकत्र निवडणूक लढवण्याचे संकेत संभाजीराजेंनी दिले आहेत. तसेच महाराष्ट्रात स्वराज्य पक्षाचे उमेदवार उभे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
 
मनोज जरांगेंनी विधानसभेच्या २८८ जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, आता संभाजीराजे छत्रपतींनीही जरांगेंसोबत निवडणूका लढवण्याचे संकेत दिले आहेत. संभाजीराजडे छत्रपती म्हणाले की, "विधानसभा निवडणूकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात स्वराज्य पक्षाचे उमेदवार उभे राहतील. मनोज जरांगेंशी चर्चा झालेली नाही. पण लवकरच चर्चा होणार असून चर्चा करायला काहीही हरकत नाही. कारण शेवटी त्यांचा दृष्टीकोन आणि माझं उद्दिष्ट एकच आहे."
 
हे वाचलंत का? -  अजितदादांना राखी बांधण्याबाबत राऊतांच्या वक्तव्यावर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
 
"शेवटी माझे पणजोबा राजर्षी शाहू महाराजांनीच पहिले आरक्षण दिले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ते अंमलात आणलं. त्यामुळे मनोज जरांगेंना माझं नेहमीच सहकार्य राहिलेलं आहे. त्यांच्याशी माझी राजकीय चर्चा झालेली नाही. पण ती लवकरच होईल," असेही ते म्हणाले.