मुंबई : राज्यात सध्या सर्वांनाच विधानसभा निवडणूकांचे वेध लागले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणूकांची तारीख घोषित होण्याची सर्वच राजकीय पक्ष वाट पाहत आहेत. शिवाय या निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर त्यांनी जोरदार तयारीही सुरु केली आहे.
लोकसभा निवडणूकीनंतर सर्वजण विधानसभेची वाट पाहत आहेत. येत्या ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या निवडणूका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, आता सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणूका होणार असल्याचे बोलले जात आहे. परंतू, निवडणूक आयोगाने याबाबद अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.
नियमानुसार, २६ नोव्हेंबर रोजी नवी विधानसभा अस्तित्वात येणे अपेक्षित आहे. त्यामुळे दिवाळीनंतरच निवडणूकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात. तसेच नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूका झाल्यास १४ किंवा १५ नोव्हेंबरला निवडणूकांचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.